Pune News: मनुष्यहानी झाल्यावर पिंजरा लावणार का? गोनवडी ग्रामस्थांचा सवाल.

पिंजरा गावात आणून महिना तरीही लावण्यास टाळाटाळ.
pune
punesakal
Updated on

आंबेठाण - गोनवडी ( ता.खेड ) येथे मागील दोन महिन्यांपासून बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत आहे.काही जनावरांना देखील बिबट्याने हल्ला करून लक्ष्य केले आहे.

नागरिकांनी अनेक वेळा मागणी केल्यानंतर वन विभागाने गावात पिंजरा आणून ठेवला पण ज्या भागात बिबट्याचा वावर आहे त्या ठिकाणी मात्र हा पिंजरा लावण्यास वन विभाग चालढकल करीत आहे. त्यामुळे एखाद्या नागरिकाचा जीव जाण्याची वनविभाग वाट पाहत आहे का ? असा सवाल गोनवडी ग्रामस्थ करीत आहेत.

गोनवडी हे खेड तालुक्यातील कृषिप्रधान गाव आहे. भामा नदीकाठी गाव असल्याने आणि बागायती विशेषतः उसाचे क्षेत्र मोठया प्रमाणात असल्याने वन्य प्राण्यांना लपण्यासाठी मोठी जागा आहे.मागील दोन महिन्यांपासून या गावच्या शिवारात बिबट्याचा वावर आहे.

शेतात काम करणारे शेतकरी, शाळेत जाणारे विद्यार्थी तसेच एमआयडीसी भागात कामाला जाणारे कामगार यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. बिबट्याने गावातील काही जनावरांवर देखील हल्ला केल्याचे प्रकार घडले होते. या भीतीपोटी सरपंच संदीप मोहिते आणि ग्रामस्थानी वनविभागाकडे पिंजरा लावावी अशी मागणी केली होती.

अनेक वेळा मागणी केल्यानंतर वनविभागाने गावात एक पिंजरा आणून ठेवला आहे मात्र मागील एक महिन्यापासून हा पिंजरा सयाजी किसन मोहिते यांच्या घराजवळ पडून आहे. ज्या भागात बिबट्याचा वावर जास्त आहे त्या भागात हा पिंजरा लावणे गरजेचे आहे.

परंतु केवळ उदासीनतेमुळे वनविभागाने हा पिंजरा तसाच पडून ठेवला आहे. त्यामुळे एखाद्याचा बळी गेल्यानंतर वनविभाग पिंजरा लावणार का ?असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत.

संदीप मोहिते ( सरपंच,गोनवडी ) -

pune
Forest Vegetable Competition 2023: स्पर्धेसह वनभाज्यांची कीर्ती सातासमुद्रापार! कॅनडाच्या संशोधकाची संकल्पना

मागील एक महिन्यापासून पिंजरा धूळ खात पडून आहे. एखाद्याचा जीव गेल्यावर पिंजरा लावणार काय ?.मागील काही दिवसांत जनावरांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.यात वन विभागाची उदासीनता दिसून येत आहे.

योगेश्वर पाटोळे ( वनसंरक्षक ,वनविभाग,चाकण ) -

pune
Pune Crime : हॉटेलमध्ये जास्त वेळ बसल्याने पुण्यात ग्राहकाला दांडक्याने मारहाण, डोक्यात फोडली बाटली; तिघांना अटक

मादी जातीचा बिबट्या असल्याने त्याला पिल्ले आहेत. जर पिंजऱ्यात एखादे पिल्लू अडकले तर मादी आक्रमक होऊ शकते.त्यामुळे हल्ल्याची शक्यता अधिक आहे. याबाबत साहेबांशी बोलणे झाले असून लवकरच निर्णय घेऊ. तोपर्यंत नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सावधानता बाळगावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.