Pune News : जुन्नरला सामाजिक सलोख्याचे दर्शन,गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पैगंबर जयंतीची मिरवणूकीचा निर्णय

शिवजन्मभूमीतील सामाजिक एकता व सलोखा कायम रहावी या हेतूने हा निर्णय घेण्यात आला
junner
junnersakal
Updated on

जुन्नर - गणपती विसर्जन व ईद ए मिलाद एकाच दिवशी येत असल्याने जुन्नर शहरातील मुस्लिम समाजाने ईद निमित्त काढण्यात येणारी पैगंबर जयंतीची मिरवणूक दुसऱ्या दिवशी करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या उपस्थितीत झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत हा निर्णय कादरीया वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष रऊफ खान यांनी जाहीर केला.

गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या निमित्ताने जुन्नर येथे शांतता समितीची बैठक सोमवार ता.११ रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस,उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, पोलीस निरीक्षक नारायण पवार ,नगराध्यक्ष शाम पांडे,आशा बुचके, गणेश मंडळाचे कार्यकर्ते, कादरीया वेलफेअर सोसायटीचे सदस्य ईद मिलाद कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

junner
Pune News : देवेंद्र फडणवीस करतात तरी काय -सुप्रिया सुळे

शिवजन्मभूमीतील सामाजिक एकता व सलोखा कायम रहावी या हेतूने हा निर्णय घेण्यात आला असून दरवर्षी प्रमाणे गणेश विसर्जनाच्या दिवशी बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांना कादरीया वेलफेअर सोसायटी तर्फे सकाळी चहा ,नाश्ता,पाणी देण्यात येणार असल्याचे रऊफ खान यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक फिरोज पठाण, सईद पटेल, मोहमद उमर , अजीम तिरंदाज, मनू पिरजदे, इकबाल बेग, जरार कुरेशी, रऊफ इनामदार ,वाजीद इनामदार,हनीफ शेख, उपस्थित होते.

junner
Solapur News : शासकीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यासमवेत तीन दिवसीय गाव भेट दौरा-आ.समाधान आवताडे

यापूर्वी समाजाच्या बैठकीत दोन्ही समाजाला आपापल्या सणांचा आनंद घेता यावा तसेच शहरात शांतता व सामाजिक सलोखा रहावा. यासाठी ईद ए मिलादच्या दुसऱ्या दिवशी पैगंबर जयंतीची मिरवणूकीत कुराण पठण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()