Pune News : पंतप्रधान मोदींनी याकडे...; आमदार राजा भैय्यांचं हिंदू जन आक्रोश मोर्चात आवाहन

Narendra Modi and : MLA Raja Bhaiyya
Narendra Modi and : MLA Raja Bhaiyya
Updated on

पुणे - महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात लव्ह जिहादवर बंदी यावी, धर्मांतर बंद व्हायला हवं, लव्ह जिहादवर कायदा करा, अशी मागणी तेलंगणाचे आमदार राजा भैय्या यांनी केलं. पुण्यात आज हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. (Hindu Jan Akrosh Morcha news in Marathi)

Narendra Modi and : MLA Raja Bhaiyya
Elon Musk...तर ट्विटरसाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे; इलॉन मस्क यांचं ट्विट

भारतातील अनेक तरुण-तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लव जिहादच्या नावाखाली फसवल जात आहे. काही दिवसांपूर्वीच एका मुलीचे ३५ तुकडे करून तिला मारण्यात आलं होतं. भारताच्या अनेक ठिकाणी बलात्कार होत आहेत, असं राजाभैय्या यांनी म्हटलं.

ते पुढं म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांनी देशासाठी आहुती दिली. त्यांनी ज्या दिवशी बलिदान दिलं तो दिवस संपूर्ण भारतात बलिदान दिन म्हणून घोषित केला पाहिजे. आज याच मागणीसाठी पुण्यात मोर्चाचे नियोजन करण्यात आलं आहे. तसेच येत्या काळात गो- हत्या, लव जिहाद आणि धर्मांतर या विषयी कायदा बनला नाही तर संपूर्ण भारतात असे मोर्चे निघतील, असा इशाराही राजा भैय्या यांनी दिला.

Narendra Modi and : MLA Raja Bhaiyya
Abu Azmi Threat Call : अबू आझमींना जीवे मारण्याची धमकी! काय आहे प्रकरण?

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राच्या राज्य सरकारला आवाहन करतो की, त्यांनी याबाबत गंभीर विचार करायला हवा. आज मोठ्या संख्येने बांगलादेशी महाराष्ट्रात घुसत आहे. यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन करतो की, यावर काही केलं नाही तर आगामी काळात भयानक परिणाम दिसतील, असंही राजा भैय्या यांनी नमूद केलं.

दरम्यान धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावर राजकारण करू नका. त्यासाठी दुसरे विषय आहेत. तसेच एखादा मंत्री संभाजी महाराज यांच्यावरून राजकारण करत असेल तर त्यांच्यावर बहिष्कार टाका, अस आवाहनही राजाभैय्या यांनी उपस्थितांना केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()