Pune News : तळेगाव ढमढेरे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा संपन्न

"शरद पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे शिरूर तालुक्यात औद्योगिक क्रांती झाली तसेच चासकमानचे पाणी टेलपर्यंत गेल्यामुळे तालुका सुजलाम सुफलाम होण्यास मदत झाली आहे.
talegaun
talegaunsakal
Updated on

तळेगाव - महाराष्ट्रात फुले -शाहू -आंबेडकर यांच्या विचाराची नितांत गरज असून, शरदचंद्रजी पवार साहेब यांचे पुरोगामी विचार पुढे नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी संघटनात्मक कामास प्राधान्य द्यावे. साहेबांचे वय झाले असले तरी त्यांचा विचार तरुण आहे.

कार्यकर्त्यांनी मनातील संभ्रम दूर करावा. जे पक्षात मोठे होऊन गेले त्यांना जाऊ द्या, परंतु राहिलेले निष्ठावंत जागेवरच आहेत. शेतातील तळे व मळा म्हणजेच विचारांचा सागर आपल्याकडे आहे, त्यातूनच समृद्धीचे मळे फुलतील. पवार साहेबांनी समाजासाठी आयुष्य वेचले विचारधारा कधीही सोडली नाही आता भाकरी पलटवायची आहे,

जुन्या नव्यांचा मेळ घालून संघटना मजबूत करायची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नव नेतृत्व निर्माण करणारा पक्ष आहे. आगामी काळात इंडिया आघाडीला साथ द्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांनी केले आहे.

talegaun
SAKAL Exclusive: : F & O ट्रेडिंग शिकवणीतून विजय ठाकरेंचे तरुणाईला मार्गदर्शन

तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात श्री शेवाळे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी जगन्नाथ शेवाळे आणि पुणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी स्वप्निल गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल आमदार ॲड. अशोक पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

"शरद पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे शिरूर तालुक्यात औद्योगिक क्रांती झाली तसेच चासकमानचे पाणी टेलपर्यंत गेल्यामुळे तालुका सुजलाम सुफलाम होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे आम्ही शरद पवार साहेबांबरोबर आहोत. आगामी काळातही सर्व कार्यकर्त्यांनी साहेबांची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवावी असे मत आमदार ॲड. अशोक पवार व माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी व्यक्त केले".

talegaun
Dr M S Gosawi Death : शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी यांचे निधन; शरद पवारांनी घेतलं अंत्यदर्शन

" मला राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी संधी दिल्यामुळे पवार साहेबांचे विचार जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पोचवून आगामी काळात संघटनात्मक कामास प्राधान्य देणार असल्याचे स्वप्निल गायकवाड यांनी सांगितले."

यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, माजी सभापती आरती भुजबळ, समता परिषदेचे सोमनाथ भुजबळ, राष्ट्रवादी युवती आघाडीच्या तालुकाध्यक्ष संगीता शेवाळे, लतिका वराळे, महेश ढेरंगे, नामदेव गिरमकर, नितीन वडघुले, शिवाजी शेलार, राजेंद्र दरेकर, संतोष दरेकर, शिरीष लोळगे आदींनी मनोगत व्यक्त करून आम्ही शरद पवार साहेबांबरोबर असल्याचे सांगितले.

talegaun
PM Modi: 'D येणार आणि C जाणार..', 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे पंतप्रधान मोदींचा फॉर्मूला काय आहे? जाणून घ्या

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटभाऊ भुजबळ, संचालक विश्वास ढमढेरे, खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र नरवडे, माजी उपसभापती अनिल भुजबळ, माजी सभापती काकासाहेब कोरेकर, आबासाहेब करंजे, पंडित दरेकर, ॲड. सुदीप गुंदेचा, उद्योजक हरीश येवले पाटील, राहुल करपे, राजेंद्र जाधव, दिलीप मोकाशी, विद्या भुजबळ, अमित राऊत, पि.के. गव्हाणे, शिवाजी वडघुले, अरुण करंजे, महेश भुजबळ, संभाजी भुजबळ, प्रफुल्ल शिवले, प्रा. भाऊसाहेब भोसले, तालुक्यातील कानाकोपऱ्यातून आलेले राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

माजी उपसरपंच बाळासाहेब ढमढेरे यांनी सूत्रसंचालन केले.

घोडगंगा कारखान्याचे संचालक विश्वास ढमढेरे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.