पुणे - भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी नुकतीच प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये चिटणीसपदी पुणे शहरातून रेश्मा शेख यांना संधी देण्यात आली आहे. शहरात भाजपच्या अनेक माजी नगरसेविका व अन्य अनुभवी कार्यकर्त्या असतानाही या ७२ जणांच्या कार्यकारिणीत केवळ एकमेव महिलेला संधी दिल्याने याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
भाजपसाठी पुणे शहर महत्त्वाचे असून, याठिकाणी महापालिका, आठ विधानसभा, एका लोकसभेवर विजय मिळविण्यासाठी सातत्याने पक्षातर्फे प्रयत्न सुरु आहेत. आगामी लोकसभेसाठी महिला उमेदवाराचाही विचार केला जाऊ शकतो अशीही पक्षात चर्चा सुरु होती. २०१७ ते २०२२ या कालावधीत महापालिकेत भाजपच्या सुमारे ४८ नगरसेविका होत्या. त्यामुळे शहरात महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांचेच मोठे जाळे आहे.
भाजपची शहर कार्यकारिणी गेल्या महिन्यात नुकतीच जाहीर झाली. त्यामध्ये शहरातील माजी नगरसेविकांना संधी मिळाली नसल्याने त्या नाराज होत्या. त्यामुळे महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीत काही जणांना महत्त्वाच्या पदावर संधी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात एकाही माजी नगरसेविका व पक्षातील जुन्या महिला कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही
भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी नुकतीच प्रदेश कार्यकारिणी जाहीर केल्या कार्यकारिणीमध्ये १७ उपाध्यक्ष, ८ सरचिटणीस, १ कोषाध्यक्ष, ११ सोशल मीडिया सहसंयोजक, १ कार्यालयीन सचिव यांचा समावेश आहे. तर ५१ जण निमंत्रित सदस्यांचा समावेश देखील यामध्ये करण्यात आला आहे. या निमंत्रित सदस्यांमध्ये पुण्यातून आमदार माधुरी मिसाळ, माजी आमदार शोभा फडणवीस, मेधा कुलकर्णी यांच्यासह उषा वाजपेयी, भारती विनोदे, मीनाक्षी पाटील यांचा समावेश आहे.
चित्र वाघ यांना नुकतेच महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होऊन एक वर्ष झाले आहे. त्या भाजपमध्ये सक्रिय झाल्यानंतर पुण्यातील संजय राठोड प्रकरण, रघुनाथ कुचीक प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावेळी शहर भाजपतर्फे आंदोलनेही करण्यात आलेले होती. तसेच नगरसेवकांतर्फे महिलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना चित्र वाघ यांनी उपस्थिती लावलेली होती. त्यामुळे शहरातील कार्यकर्त्या,
पदाधिकाऱ्यांसोबत सक्रिया सहभागी असल्या तरी त्यांच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये त्याचे प्रत्यंतर झालेले नाही. दरम्यान, शहर भाजपतर्फे महिलांची नावे महिला मोर्चाची प्रदेश कार्यकारिणीसाठी नावे पाठविली नसल्याचीही माहिती मिळत आहे.
दरम्यान, यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.