Pune News: पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा आता दत्तक देण्यात येणार आहे. केंद्रीय पुरातत्व खात्याकडून ऐतिहासिक वारसा स्थळांसाठीची नवी योजना जाहीर करण्यात आली आहे. या नव्या योजनेनुसार पुणे शहरासह पुणे जिल्ह्यातील एकूण पाच ऐतिहासिक वारसा स्थळ आता दत्तक घेता येणार आहे. ज्यामध्ये शनिवारवाड्याचा सुद्धा उल्लेख आहे. या निर्णयावर मात्र पुणेकरांनी पुणेरी शैलीत विरोध केला आहे.
शनिवार वाडा दत्तक घेता येणार म्हणजे आपलंच मुल आपण दत्तक घ्यायचं का? वैभवशाली वारसा असलेली वास्तू आपणच दत्तक घेणे योग्य आहे का असे खोचक प्रश्न पुणेकरांनी उपस्थित केले आहेत. दुसऱ्या बाजूला, जर शनिवार वाडा दत्तक घेतला जात असेल तर सरकार कडे पैसे नसावेत आणि आमच्या खिशातून जो टॅक्स आम्ही भरतो त्यातून पैसे नाहीत का? अशी टीका सुद्धा पुणेकरांनी केलीय.