नारायणगाव - खाजगी क्लास मधून घरी निघालेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी ओतुर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक नारायण भाऊसाहेब बर्डे (वय ३८ वर्ष राहणार आकाशगंगा कॉलनी, आळेफाटा ता.जुन्नर जि. पुणे ) याच्यावर पॉस्को( बालकांचे लैंगिक अपराधाचे संरक्षण अधिनियम २०१२ चे १२)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
या घटनेमुळे खाकी वर्दीला काळा डाग लागला असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.रक्षकच भक्षक झाल्यास न्याय कोणाकडे मागायचा. असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण) यांनी या घटनेची दखल घेऊन आरोपीला पोलीस सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात यावे. अन्यथा नारायणगाव पोलीस स्टेशनवर महिलांचा मोर्चा काढण्यात येईल.असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार चौथी इयत्तेत शिक्षण घेत असलेली सदर अल्पवयीन मुलगी सोमवारी (ता.२) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खाजगी क्लास मधून पायी घरी निघाली होती. दरम्यान आरोपी नारायण बर्डे याने तुला शंभर रुपये देतो मोटरसायकलवर बस असा आग्रह धरला.
मुलीने नकार दिल्याने त्याने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. घरी जाऊन मुलगी रडू लागली. घडलेली घटना तिने आजीला सांगितली. मुलीच्या पालकांनी आरोपीचा शोध घेतला असता घटनास्थळ परिसरातच आरोपी आढळून आला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
आरोपीने केलेल्या कृत्याचे सीटीव्ही फुटेज नागरिकांनी पोलीस स्टेशनला दिले आहेत. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नारायणगाव पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा पोलीस नाईक नारायण बर्डे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.आरोपी ओतुर पोलीस स्टेशनमध्ये मागील चार वर्षापासून सेवेत आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे हे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.