Pune News : प्राध्यापिकेने बनविले बनावट ध्वनिफीत ओळखणारे सॉफ्टवेअर ; असली-नकलीची उकल काही मिनिटांत

महाविद्यालयात शिकविताना विद्यार्थ्यांबरोबर प्रत्यक्ष कामाचा अनुभव हे सॉफ्टवेअर तयार करताना उपयोगी आला.
audio
audio sakal
Updated on

पुणे - पोलिस तपास किंवा इतर कोणत्याही बाबींसाठी ध्वनिफितीची (ऑडिओ क्लिप) सत्यता पडताळणे वेळखाऊ काम असते. स्वाक्षरी, छायाचित्र किंवा कागदपत्रे बनावट आहेत का किंवा ती मॉर्फ करण्यात आली आहेत का हे तपासणे तेवढेच कठीण. अशा वेळी सेवानिवृत्त प्राध्यापिका डॉ. शैला आपटे यांनी सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्यामुळे ध्वनिफीत, स्वाक्षरी, छायाचित्र आणि इतर कागदपत्रांचे काही मिनिटांत विश्‍लेषण होऊन अहवाल मिळतो.

अभियांत्रिकी महाविद्यालयातील नोकरीनंतर त्यांनी ६२ व्या वर्षी ‘अनुभूती सोल्यूशन्स’ ही कंपनी स्थापना केली. त्यांनी सॉफ्टवेअरची पाच पेटंट मिळविली आहेत. याशिवाय तेवढेच ट्रेडमार्क्सही मिळविले आहेत. गुन्ह्याचा तपासाला गती मिळावी, वेळेअभावी गुन्ह्याची उकल थांबू नये, तसेच तपास प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांची संख्या कमी व्हावी, या उद्देशाने त्यांनी सात सॉफ्टवेअर तयार केली आहेत.

कामाचा अनुभव आणि १९८० पासून घरात असलेला संगणक यामुळे प्रोग्रामिंगची सवय आधीपासूनच होती. महाविद्यालयात शिकविताना विद्यार्थ्यांबरोबर प्रत्यक्ष कामाचा अनुभव हे सॉफ्टवेअर तयार करताना उपयोगी आला. झोकून देऊन काम करण्याची सवय या स्टार्टअपमध्ये उपयोगाची ठरली. माझा आवडता विषय डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग होता. त्यात अभ्यास असल्याने उत्पादनांचा आराखडा करणे सोपे झाले. आपण समाजासाठी काही करू शकलो याचे समाधान आहे.

- डॉ. शैला आपटे, संस्थापिका, अनुभूती सोल्यूशन्स अनुभूती स्पीच लॅब

audio
Solapur : ऊसापासुन इथेनॉल निर्मिती करणार ; हंगामात साडे सहा लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दीष्ट - विश्वराज महाडिक

एखाद्या व्यक्तीचा प्रत्यक्ष आवाज आणि पोलिसांना सापडलेली ध्वनिफीत यांची तुलना करून दोन्ही शब्द बोलणारी व्यक्ती एकच आहे की नाही हे ओळखणारे तंत्रज्ञान

ऑडिओ ऑथेंटिकेशन

ध्वनिफितीत काही बदल झाले असतील तर विविध अल्गोरिदम वापरून त्यातील फेरफार शोधले जातात, यात कृत्रिम प्रज्ञा (एआय) वापरून बनविलेली ध्वनिफीतही तपासता येते

स्पीकर डायरायझेशन

एकाच गटातील वेगवेगळ्या व्यक्तींचा आवाज स्वतंत्र करणारे तंत्रज्ञान

अनुभूती स्पीकर व्हेरिफिकेशन

ध्वनिफितीमधील आवाज असलेली व्यक्ती कोणत्याही भाषेत, कोणतेही शब्द बोलली असली तरी बोलणारी व्यक्ती तीच आहे हे शोधणारे तंत्रज्ञान

अनुभूती इमोशन डिटेक्शन

व्यक्तीच्या आवाजावरून त्याचा मूड ओळखण्याचे तंत्रज्ञान

अनुभूती नॉइज कॅन्सलेशन

audio
Ahmednagar : शनीदेवाचे दोन लाख भाविकांकडून दर्शन ; वाहतूक कोंडी; लटकूंची पूजासाहित्य खरेदीसाठी दमबाजी

एखाद्या ध्वनिफितीतील गोंगाट वेगळा करून हवा असलेला नेमका आवाज स्वतंत्र करणारे तंत्रज्ञान

इमेज ऑथेंटिकेशन

स्वाक्षरी बनावट आहे की खरी हे शोधण्याची क्षमता, मॉर्फ केलेली छायाचित्रे ओळखता येतात, हस्ताक्षर ओळखून लिहिणारा माणूस तोच आहे का याचाही अंदाज बांधता येतो

अशी आहेत सॉफ्टवेअर

विश्लेषणाचे ऑटोमेशन

audio
Nagpur : रेल्वेतील मृतांचे डीएनए सुरक्षित !

छायाचित्र, स्वाक्षरी तसेच ध्वनिफितीच्या क्लिपचे विश्लेषण करायला सध्या साधारण पाच ते सहा दिवस लागतात. आमच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हेच काम दहा मिनिटांत होते. पुढील पाच मिनिटांत त्याचा अहवालही तयार केला जातो. अर्थात काही गोष्टी जसे की, आवाज ऐकून परीक्षण करण्यासाठी एक ते दोन दिवस लागतातच. ध्वनिफीत आणि छायाचित्रांच्या विश्लेषणाचे ऑटोमेशन करण्यात आले आहे, असे डॉ. आपटे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()