Pune News : उपकार्यकारी अभियंता रावळे यांच्या आश्वासनामुळे शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित

कालवा सल्लागार समितीची बैठक न घेता येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्याद्वारे 28 जुलैपासून 2023 पासून 1400 कुसेक्सने आवर्तन सुरू केले आहे.
pune news
pune news sakal
Updated on

नारायणगाव -येडगाव धरणातील उपयुक्त पाणी साठ्याची सद्यस्थिती पाहता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये शेतकरी संघटनेने केलेल्या मागण्याचा विचार केला जाईल.

असे लेखी आश्वासन कुकडी पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र रावळे यांनी दिल्यामुळे शेतकरी संघटनेच्या वतीने आज येडगाव धरण जलाशयाजवळ सुरू केलेले आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले. मात्र मागण्याचा विचार न झाल्यास येडगाव धरण जलाशयाजवळ हक्काच्या पाण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल.

pune news
Mumbai News : जमीनीच्या वादातून नेवाळीत शेतातच चुलत भावंड आपापसात भिडली

असा इशारा या वेळी शेतकरी संघटनेचे नेते अंबादास हांडे, तालुका अध्यक्ष संजय भुजबळ, युवा अध्यक्ष प्रमोद खांडगे, शिवनेरी शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष राजेंद्र ढोमसे यांनी दिला.

कालवा सल्लागार समितीची बैठक न घेता येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्याद्वारे 28 जुलैपासून 2023 पासून 1400 कुसेक्सने आवर्तन सुरू केले आहे. मागील 32 दिवसात येडगाव धरणातून कर्जत,करमाळा, श्रीगोंदा या तालुक्यासाठी सुमारे साडेचार टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे येडगाव धरणाची पाणी पातळी खालवली आहे.

pune news
Shaktikanta Das: शक्तीकांत दास जगातील 3 सर्वोत्कृष्ट बँकर्सपैकी एक, पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक

खरीप पिकांसाठी सोडलेल्या या आवर्तनाद्वारे कुकडी प्रकल्पात समाविष्ट नसलेले नगर व सोलापूर जिल्ह्यातील विसापूर धरण व लहान मोठे तलाव, बंधारे बेकायदेशीर रित्या भरले आहेत. जुन्नर, पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले आहे.

दुष्काळी परिस्थितीमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला आहे.मीना, कुकडी नदीमध्ये पाणी न सोडल्यामुळे जुन्नर तालुक्यातील खरीप पिके करपून गेले आहेत. धरणग्रस्त भागातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. असे आरोप करून येडगाव धरणातून सोडलेले आवर्तन बंद करण्यासाठी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आज सकाळी येडगाव धरण जलाशया जवळ गेले होते.

pune news
SAKAL Exclusive: : F & O ट्रेडिंग शिकवणीतून विजय ठाकरेंचे तरुणाईला मार्गदर्शन

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली येडगाव धरण जलाशय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान उपकार्यकारी अभियंता राजेंद्र रावळे यांनी शेतकरी संघटनेचे नेते अंबादास हांडे ,तालुकाध्यक्ष संजय भुजबळ , प्रमोद खांडगे,उपाध्यक्ष अजित वालझाडे,अजित वाघ ,विभागीय युवा अध्यक्ष सचिन थोरवे , शिवनेरी शेतकरी संघटनेचे ढोमसे आदि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी रावळे म्हणाले

आज सायंकाळी चार वाजता पुणे येथे कालवा सल्लागार समितीची बैठक आहे. आपल्या मागण्यांचा या बैठकीत सारासार विचार केला जाईल. सुरू असलेले कुकडी डावा कालव्याचे खरीप आवर्तन बंद करू नये. अशी विनंती शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना केली.

याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. रावळे यांनी आश्वस्त केल्यामुळे आजचे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात येत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले. मात्र आमच्या मागण्या बाबत योग्य निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.