Pune News : कोर्टात केस बांधल्याने न्यायालयाच्या कामात अडथळा ; महिला वकिलांसाठी अजब फतवा

ही नोटीस सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे.
Girl Tying hair
Girl Tying hairSakal
Updated on

पुणे जिल्हा न्यायालयाकडून एक अजब फतवा काढण्यात आला आहे. महिलांनी न्यायालयात केस बांधल्याने न्यायालयाच्या कामकाजात अडथळा निर्माण होतो, असं हा आदेश सांगतो. या आदेशाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी हा आदेश शेअर केला आहे.

काय म्हटलंय या नोटिशीमध्ये?

महिला वकील अनेकदा न्यायालयामध्ये केस बांधतात किंवा वेणी घालतात, असं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे न्यायालयाच्या कामकाजावर परिणाम होतो. त्यामुळे महिला वकिलांनी यापुढे हे करणं टाळावं, अशी सूचना देण्यात येत आहे. पुणे जिल्हा न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडून हा आदेश काढण्यात आल्याचं दिसत आहे. या आदेशावर २० ऑक्टोबर २०२२ अशी तारीख दिसत आहे.

वकील इंदिरा जयसिंग यांनी ट्वीट करत नोटिशीचा फोटो शेअर केला आहे. "महिला वकिलांमुळे कोण विचलित होत आहे आणि का?", असंही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मात्र पुणे बार असोसिएशनने मात्र अशी कोणतीही नोटीस आली नसल्याचं सांगितलं आहे. मात्र बार अँड बेंचने दिलेल्या वृत्तानुसार ही नोटीस आक्षेपानंतर लगेचच मागे घेण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.