लोणी काळभोर : शाळेमध्ये भीतीचे वातावरण नाही - दत्तात्रय जगताप

शासनाने दिलेल्या कोरोना संदर्भातील सर्व उपाय योजना आमलात आणून शाळा सुरु केल्या आहेत.
दत्तात्रय जगताप
दत्तात्रय जगतापsakal
Updated on

लोणी काळभोर : शासनाने दिलेल्या कोरोना संदर्भातील सर्व उपाय योजना आमलात आणून शाळा सुरु केल्या आहेत. त्यामुळे शाळेमध्ये कोणत्याही प्रकारचे भीतीचे वातावरण नसल्याचे प्रतिपादन राज्याचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी केले आहे.

लोणी काळभोर (ता. हवेली ) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी सोमवारी (ता. ०४ ) मुलांना गुलाब पुष्प, पुस्तकाचे संच देऊन विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी दत्तात्रय जगताप बोलत होते.

दत्तात्रय जगताप
साताऱ्यात कोरोना केअर सेंटर्सची संख्या घटली

यावेळी शिक्षण अधिकारी सुनंदा वाखारे शिक्षण निरीक्षक रवींद्र पानसरे, पंचायत समितीच्या शिक्षणविस्तार अधिकारी निलिमा म्हेत्रे, केंद्र प्रमुख भरत इंदलकर, पृथ्वीराज कपूर मोरियल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सीताराम गवळी, पर्यवेक्षक शरद शिंदे, रेखा पाटील, अन्सार पिरजादे, पराग होलमुखे, शशिराव शेंडगे, कल्पना बोरकर, आर. बंडगर, अर्जुन कचरे, आदि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना दत्तात्रय जगताप म्हणाले, "कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याने ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यात आल्या आहे. शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करताना शाळांना मोठी कसरतच करावी लागत आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता यांना प्राधान्य देण्यात येत आहे."

दत्तात्रय जगताप
वाघोली : कमी-उच्च दाबाच्या वीज पूरवठयामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळाली

शासनाने जाहीर केलेल्‍या निर्णयानुसार सोमवार (ता. ४) पासून इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्‍या वर्गांना सुरवात झाली. या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालयांतर्फे परिसर निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया गेल्‍या तीन-चार दिवसांपासून राबविली जात होती. महाविद्यालयातील वर्गानुसार विद्यार्थ्याचे थर्मल, ऑक्सी मीटरच्या माध्यमातून शरीराचे तापमान व ऑक्सिजनची पातळी मोजून त्याची नोंद करण्यात येत होती. तसेच वर्गात विशिष्ट अंतरावरच विद्यार्थी बसवले होते. जागोजागी सॅनिटायझर चा वापर करण्यात येत होता. कोरोना रोगाच्या संदर्भातील सर्व सूचनाही विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.

- सीताराम गवळी, प्राचार्य, पृथ्वीराज कपूर मोरियल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, लोणी काळभोर, (ता. हवेली)

दीड वर्षापासून शाळा बंद होत्या, त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घेताना खूप अडचणी येत होत्या. तसेच शिक्षण हे रटाळवाणे वाटत होते. तसेच ज्या प्रकारे वर्गात शिकवताना समजते तसे ऑनलाईन शिक्षण जास्त प्रमाणत समजत नव्हते. मित्र मैत्रिणीला भेटल्यामुळे आनंद वाटत आहे.

- रोहन राठोड, विद्यार्थी, इयत्ता १० वी (ब)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.