Pune News : जुन्नरला कडकडीत बंद आणि निषेध मोर्चा,शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये बंदला मोठा प्रतिसाद

आरक्षणाची पार्श्वभूमी व आजची परिस्थिती स्पष्ट केली. तसेच सरकारने आरक्षण बाबत नेमकी कोणती भूमिका घेतली पाहिजे हे सांगितले.
junner
junner sakal
Updated on

सराटी- जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमार घटनेच्या निषेधार्थ जुन्नर तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने बुधवारी ता.०६ रोजी जुन्नर येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. सकल मराठा समाज शिवजन्मभूमी जुन्नरच्या वतीने जुन्नर शहर बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व लहान मोठे व्यावसायिक टपरीधारक यांनी सहभागी होऊन कडकडीत बंद पाळला.

जुन्नर मधील पाच रस्ता चौक येथील श्री शिव छत्रपती महाराज स्मारका पासून मोर्चाला सुरुवात झाली. नवीन बस स्थानक धान्यबाजार पेठ मार्गे जुन्नर तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चामध्ये आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, आशा बुचके, अशोक घोलप माऊली खंडागळे, गुलाब पारखे,शरद चौधरी ,योगेश केदार सुनील ढोबळे, संदेश बारवे, सचिन चव्हाण,नरेंद्र कासार,संजय खंडागळे, गणेश महाबरे, ज्योत्स्ना महाबरे तसेच मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते.

junner
Dr M S Gosawi Death : शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी यांचे निधन; शरद पवारांनी घेतलं अंत्यदर्शन

तहसील कार्यालय आवारात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळ तुळजापूर ते मंत्रालय मराठा वनवास यात्रेचे आयोजक योगेश केदार यांनी आरक्षणाची पार्श्वभूमी व आजची परिस्थिती स्पष्ट केली. तसेच सरकारने आरक्षण बाबत नेमकी कोणती भूमिका घेतली पाहिजे हे सांगितले.

junner
Sakal Charcha Satra : कृषीला बुस्टर, ‘आत्मनिर्भर भारत’वर भर, भविष्याचा विचार...

तहसीलदार रवींद्र सबनीस यांना मोर्चाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. प्रास्ताविक सुनिल ढोबळे यांनी केले. सचिन चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

junner
Pune News : जशास तसे उत्तर देऊ, पुणे महापालिका कर्मचाऱ्यांचा नीतेश राणेंना इशारा

आभार प्रवेश देवकर यांनी मानले.आजच्या बंदमध्ये जुन्नर मधील सर्व प्रकारचे व्यावसायिक दुकाने बंद राहिल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. शैक्षणिक संस्था, बँका, शासकीय कार्यालय व अत्यावश्यक सेवा सुरू होती. बंद शांततेत पार पडला. ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक नितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी चोखबंदोबस्त ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.