धायरी -विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी आता हुक्का पार्लर मध्ये चक्क धूर काढण्याचे धडे गिरवताना दिसत आहेत. पालक मोठी स्वप्न बघून महागडे शिक्षण देण्यासाठी धडपडत असताना काही विद्यार्थी मात्र हर स्वप्न को धूए मे उडवताना दिसत आहेत.
सिंहगड रस्त्यावरील शैक्षणिक संस्थांचा मोठा तळ असलेल्या वडगाव ,नवले पुल भागामध्ये आता एक सोडून अनेक ठिकाणी हुक्का(शिशा) पार्लर सुरू आहेत. या अवैध व्यवसायाला कोण पाठबळ देतोय ?असा प्रश्न पालक वर्गातून विचारला जाऊ लागला आहे
जुगार, मटका, हुक्का पार्लर अशा अवैध धंद्यांना बंदी असताना हे व्यवसाय राजरोसपणे कोणता परवाना घेऊन सुरू आहेत हाही प्रश्न आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशाला स्थानिक पोलीस स्टेशन व अधिकारी केराची टोपली दाखवत आहेत तर पोलीस आयुक्त यावर काही कारवाई करणार का असा देखील प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे.
वडगाव नऱ्हे परिसरात मोठमोठ्या शैक्षणिक संस्था आहेत या संस्थांमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून व देशातून शिक्षण घेण्यासाठी मुलं मुली येत असतात हा परिसर नेहमीच विद्यार्थ्यांनी गजबजलेला असतो .याच परिसरात अलीकडच्या काळात हुक्का पार्लर सुरू झाली आहेत.त्यामुळे या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी विद्यार्थिनी या पार्लर मध्ये जातात आणि व्यसनाधीन होतात.
गस्तेची मिळते आधीच माहिती
या भागातील हुक्का पार्लर चालकांना आज कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची रात्रगस्ती आहे त्याची आधीच माहिती असते असे दिसून आले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक गस्तीसाठी परिसरामध्ये जवळ येत असतानाच हॉटेलचे सर्व लाईट बंद केले जातात. युवक युवती मात्र हुक्याच्या धुरामध्ये दंग झालेले असतात.
रात्र चढते अन नशाही
विद्यार्थी विद्यार्थिनी कॉलेज बुडवून वडगाव बुद्रुक, गोयल गंगा, नवले पूल,नऱ्हे परिसरात असणाऱ्या हुक्का पार्लर मध्ये पार्टीला आवर्जून हजेरी लावतात. अनेक वेळा तर कॉलेजची ४०ते५० मुलं-मुली ग्रूपने हुक्का पिण्यासाठी येतात आणि पॉटवर पॉट पिऊन नशेत असतात. सोळा ते अठरा वयाची मुलं-मुली देखील या नशेत बुडून गेलेली असतात. मुलांना शारीरिक आजार देखील जडले आहेत अनेक मुलं संपूर्ण दिवसभर जेवण करत नाही. मुला-मुलींचे आरोग्य व्यसनाधीनतेच्या आहारी गेल्याने धोक्यात आले आहे.
तरुणाईला आकर्षण
एका बैठकीत निघतो आठशे ते हजार रुपयांचा धूर
हॉटेलचे रूप टॉप ,चौपाटी व व्यावसायिक बंदिस्त इमारतीत चालतात पार्लर
रात्री तीन चार वाजेपर्यंत सुरू असूनही कोणाचा आक्षेप नाही.
हद्दीत कोणी चोरून हुक्का पार्लर चालवत असेल तर तशी माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल..
-सुहेल शर्मा- पोलीस उपयुक्त परिमंडळ-३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.