घोडेगाव - आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळा मधील शिक्षकांची क्षमता सिद्ध करण्यासाठी चाचणी परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने घेतला होता. मात्र शासनाकडुन उपलब्ध सुविधांचा अभाव लक्षात न घेता, हा निर्णय केवळ शिक्षकांना अपमानित करण्यासाठी घेण्यात आलेला होता सर्व कर्मचारी बहिष्कारावर ठाम असताना ही केवळ कोणाच्यातरी अठ्ठाहासासाठी घेतलेल्या १७ सप्टेंबर च्या क्षमता चाचणी परीक्षेवर शिक्षक कर्मचारी ठाम
राहुन बहिष्कार १०० टक्के यशस्वी केला आहे अशी माहिती घोडेगाव आदिवासी प्रकल्प विभागाचे सागर शिंदे यांनी दिली. मात्र घोडेगाव आदिवासी प्रकल्पातील385 शिक्षकांपैकी 5 शिक्षकांनी ही परीक्षा दिली असल्याचे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांनी दिली. शासनाला या परीक्षेबाबतचा अहवाल पाठवून त्यांच्यानिर्देशनानुसार कार्य़वाही करण्यात येईल असेही गायकवाड यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या आदिकासी विकास विभाच्या आदेशानुसार १७ सप्टेंबर रोजी सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत शिकवणा-या शिक्षकांच्याक्षमतेचे परीक्षण करणार होते. शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षकांना ही चाचणी ऐच्छीक असताना संपुर्ण राज्यातील शासकीय व अनुदानित शिक्षक कर्मचारी यांनाअनिवार्य करुन नाहक त्रास देण्याचे काम सुरु होते परंतु येथील प्रकल्पातील सर्व कर्मचारी यांनी एकजुट दाखवुन प्रशासन यांचे विरोधात एकत्र येउन आजचीपरीक्षा न देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे आज १०० टक्के अनुपस्थित राहुन बहिष्कार यशस्वी केला असा दावा संघटनेने केला आहे.
यावेळी संघटनेचे प्रकल्प अध्यक्ष सागर शिंदे, अनुदानित आश्रमशाळा अध्यक्ष सुदाम पवार, मुख्याध्यापक संघाचे राजेंद्र आंधळे, राज्य कार्यकारणीसदस्य नवनाथ भवारी, विष्णु साखरे, संजय राठोड, विभागीय कार्यकारणी उपाध्यक्ष संदिप ओव्हाळ, भागवत भंगे, संदीप शेलार, तुळाजीराम आघाव, अमरदिपकांबळे, सुखदेव आरसुळे, प्रकल्प कार्यालय शासनमान्य आदिवासी कर्मचारी संघटना सर्व पदाधिकारी तसेच सर्व शासकीय, अनुदानित आश्रमशाळा येथे कार्यरतअसणारे मुख्याध्यापक, उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक व रोजंदारी कर्मचारी आदि उपस्थित होते.
निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, शिक्षण विभागाचे नियम डावलून शिक्षकांना या परीक्षेची सक्ती करत आहे. शाळेतील मूलभूत प्रश्न बाकीअसताना शिक्षकावर या परीक्षेची सक्ती कशासाठी असा सवाल करत घोडेगाव प्रकल्पातील शिक्षकांनी या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र या परीक्षेला शिक्षकांनी कडून विरोध केला आहे. शिक्षकांची क्षमता पाहून विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरवायची की विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून शिक्षकांचीक्षमता ठरवायची आहे. या परीक्षेतून वरिष्ठांना नेमकी कोणती गुणवत्ता पाहायची आहे. आश्रम शाळांतील सुविधांचा अभाव लक्षात न घेता हा निर्णय केवळ
शिक्षकांना अपमानित करण्यासाठी घेण्यात आला आहे.
शिक्षणा सारख्या क्षेत्रात शिक्षकांची गुणवत्ता तपासली पाहिजे शाळांच्या भौतिक व शैक्षणिक सुविधा यांची तपासणी झाली पाहिजे राज्य व केंद्र
शासन आदिवासी भागातील नागरिकांसाठी कोट्यावधी रूपये खर्च करतील अशा वेळी शिक्षकांची गुणवत्ता क्षमता परीक्षा घेणे उचित असल्याचे मत विद्यार्थी व
पालकांनी व्यक्त केले आहे.
प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड म्हणाले, शासनाच्या आदिवासी विभागाच्या पत्रानुसार शिक्षकांची क्षमता सिध्द करण्यासाठीची चाचणी परीक्षा
काल 17 सप्टेंबर रोजी होती. या परीक्षेची सर्व तयारी करण्यात आली होती. प्रकल्पातील 385 शिक्षकांपैकी केवळ 5 शिक्षकांनी ही परीक्षा दिली आहे. शिक्षक
संघटेनेने बहिष्काराचे पत्र दिले होते. याचा वस्तुनिष्ठ अहवाल आदिवासी कार्यालयाला पाठविण्यात येणार आहे. त्यांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही करण्यात
येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.