पुणे : लक्ष्मीपूजनानंतर फटक्यांची जोरदार आतषबाजी
पुणे : लक्ष्मीपूजनानिमित्त (Diwali Festival) केल्या जाणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे (Fireworks) शहरात गुरुवारी वेगवेगळ्या ठिकाणी आग लागण्याच्या (fire incidents) १२ घटना घडल्या. यामध्ये एका घटनेव्यतिरिक्त अन्य ठिकाणी कोणीही जखमी झाले नाही.
लक्ष्मीपूजनानंतर दरवर्षी शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली जाते. मागीलवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे फटाके वाजविण्यावर मर्यादा होत्या. यावर्षी प्रादूर्भाव कमी झाल्याने दिवाळीचा चांगलाच उत्साह नागरिकांमध्ये होता. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी होण्याची शक्यता होती. दरम्यान, सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत शहरात आतषबाजी सुरू होती. त्यामुळे घरांवर, अवतीभोवती पडलेला पालापोचाळा, कागद, प्लास्टिक, कचऱ्यावर फटाके पडल्याने आग लागण्याच्या घटना घडल्या. वेगवेगळ्या बारा ठिकाणी आग लागल्याची वर्दी अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याची दलाने दिली.
सिंहगड रस्त्यावरील नवशा मारुती मंदिराच्या परिसरात गुरुवारी सायंकाळी आग लागली. त्याचबरोबर येरवडा, प्रभात रस्ता, कोथरूड, सहकारनगर, गुरुवार पेठ, मुंढवा या भागातही आगीच्या घटना घडल्या. बहुतांश घटना किरकोळ स्वरूपाच्या होत्या. घरावर साठलेला पालापाचोळा, झाडांवर फटाके पडल्याने आग लागली. एका ठिकाणी घरात किरकोळ स्वरूपाची आग लागली.
ठिणग्या अंगावर पडल्याने पादचारी जखमी
उंड्री परिसरात गुरुवारी सायंकाळी महावितरणच्या एका ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागली. त्यातून उडालेल्या ठिणग्या अंगावर पडल्याने तेथून चाललेला पादचारी जखमी झाला. त्यास उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अग्निशामक दलाने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.