Pune News : विमाननगर येथील भुयारी मार्ग वीस दिवसानंतरही बंदच; प्रशासनाच्या ढिम्मपणामुळे नागरिकांचे हाल

शेजारील सांडपाणी वाहिनी तुंबल्यामुळे भुयारी मार्गात पाण्याची गळती होऊन कमरे इतके पाणी साचले
pune news Viman Nagar subway remain closed even after 20 days
pune news Viman Nagar subway remain closed even after 20 days Sakal
Updated on

वडगाव शेरी : विमाननगर येथील बीआरटी मार्गातील प्रवाशांना आणि नगर रस्ता परिसरातील स्थानिकांना रस्ता ओलांडण्याकरता उपयोगी ठरणारा पादचारी भुयारी मार्ग गेले वीस दिवसानंतर ही बंदच आहे. शेजारील सांडपाणी वाहिनी तुंबल्यामुळे भुयारी मार्गात पाण्याची गळती होऊन कमरे इतके पाणी साचले आहे.

परिणामी नागरिकांचे खूप हाल होत असून जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. विमाननगर चौक येथील भुयारी मार्गात पाणी साचल्याने नागरिकांनी स्थानिक क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रारी केलेल्या आहेत.

मात्र प्रशासनाने वरिष्ठ पातळीवरून आवश्यक यंत्रणा तातडीने उपलब्ध करून न दिल्यामुळे आणि विशेष लक्ष न दिल्यामुळे ही समस्या कायम आहे. स्थानिक आरोग्य निरीक्षक आणि कनिष्ठ अभियंता आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे हे पाणी उपसण्यासाठी आणि ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र वीस दिवसानंतरही त्यांना यश आलेले नाही.

बीआरटी प्रवाशांचे हाल

बीआरटीतून विमाननगर चौकात रस्त्याच्या मध्यभागी थांब्यावर उतरणाऱ्या हजारो प्रवाशांना या भुयारी मार्गातून रस्ता ओलांडावा लागतो. मात्र भुयारी मार्ग बंद असल्यामुळे लोखंडी दुभाजकावरून उडी मारून वाहतुकीतून प्रवाशांना जावे लागत आहे. त्यात महिला, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी यांचे खूप हाल होत आहेत.

भुयारी मार्ग

तातडीने सुरू करा याकरता नगर रोड सिटीजन फोरमच्या आरती सोनग्रा, माजी नगरसेविका श्वेता खोसे गलांडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब शिंगाडे, काँग्रेसचे पदाधिकारी करीम शेख यांसोबतच काही स्वयंसेवी संस्थांनी ही प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे. मात्र मार्ग सुरू होत नसल्यामुळे हे राजकीय पक्ष आंदोलनाच्या तयारीत आहेत.

भुयारी मार्गातील पाणी आणि गाळ उपसण्यासाठी यंत्रणा आणलेली आहे. दोन दिवसात भुयारी मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न आहे.

- वैशाली भुक्तार ( कनिष्ट अभियंता, नगर रस्ता क्षत्रिय कार्यालय)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()