Pune News: काय सांगता? चाकणचा तीन कोटी रुपयांचा फूटपाथच झाला गायब!

कोणीच आवाज उठवत नाही, पादचाऱ्यांनी करायचे काय?
Pune News: The footpath disappeared!
Pune News: The footpath disappeared!Sakal
Updated on

येथील चाकण नगरपरिषदेच्या हद्दीतील जुन्या पुणे -नाशिक मार्गावरील पदपथ (वॉकिंग ट्रॅक ) हा पथारीवाल्यांनी,काही बांधकाम व्यवसायिकांनी गायब करून टाकलेला आहे.पदपथासाठी तीन वर्षांपूर्वी सुमारे तीन कोटी रुपये खर्च करण्यात आला.पदपथाचे काम करण्यात आले परंतु तो पदपथ पथारीवाले,भाजीपाला व्यवसायिकांनी, काही बांधकाम व्यवसायिकानी व्यापून टाकला आहे.त्यामुळे तो गायब झाला आहे. हे भयानक वास्तव आहे. त्यामुळे तीन कोटी रुपये खर्च हा पाण्यात गेला आहे अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Pune News: The footpath disappeared!
Pune Garbage Issue : पुणे शहरात ९१३ ठिकाणी कचऱ्याची समस्या

चाकण ता. खेड नगरपरीषदेच्या हद्दीतील जुना पुणे -नाशिक मार्गावर नगरपरिषदेने तीन वर्षांपूर्वी ठेकेदारामार्फत सुमारे तीन कोटी रुपये खर्चाचे काम करून दोन्ही बाजूने नवीन पुणे नाशिक मार्गाला जोडणारा नाणेकरवाडी फाटा रस्ता ते मार्केट यार्ड चाकण पर्यंत पदपथ तयार करण्यात आला. हा पदपथ प्रशस्त करण्यात आला आहे.सुमारे साडेतीन ते चार फूट रुंदी एका, एका बाजूने वाढविण्यात आली. परंतु हा पदपथ नागरिकांना चालण्यासाठी उपलब्ध नाही. पदपथावर नगरपरिषदेने वाहनांसाठी पार्किंगच्या खुणा, ट्रॅक पांढऱ्या रंगाने काढले होते . पांढऱ्या रंगाचे ट्रॅकही त्यावर त्यांचा माल, राडा, रोडा टाकून काही लोकांनी गायब केला आहे. पांढऱ्या ट्रॅक वरही पथारीवाले,भाजीपाला व्यवसायिक बसत आहेत.

त्यामुळे वाहने पार्किंग करायची कोठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत कोणी आवाज उठवत नाही अशी परिस्थिती आहे. माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष या पदपथाबद्दल आवाज उठवत नाही. तीन कोटी रुपये खर्च करून जुन्या पुणे- नाशिक मार्गाला दोन्ही बाजूने पदपथ तयार करण्यात आला तो नागरिकांना, जेष्ठ नागरिक, महिलांना ये -जा करण्यासाठी होता.परंतु तो भाजीपाला व्यावसायिक, पथारीवाल्यांनी गायब करून टाकल्याने नागरिकांनी,पादचाऱ्यांनी वाहनांच्या वर्दळीत ये जा कशी करायची हा प्रश्न आहे.

Pune News: The footpath disappeared!
Pune Municipal Income : पुणे महापालिकेचे या आर्थिक वर्षातील उत्पन्न ५५०० कोटी, तर ४५०० कोटी खर्च

नगरपरिषदेच्या वतीने पदपथावर पांढऱ्या रंगाने दुचाकी वाहनांसाठी पार्किंगचे ट्रॅक तयार केले गेले. परंतु तेही भाजीपाला व्यवसायिक, पथारीवाल्यांनी व इतर लोकांनी व्यापले. नगरपरिषद सोयी, सुविधेचे काम करते परंतु त्या कामाचा सत्यानाश काही लोक करतात असेही भयानक वास्तव आहे. याकडे नगरपरिषदे च्या संबंधित अधिकाऱ्याचे, कर्मचाऱ्यांचे अजिबात लक्ष नाही. नगर परिषदेच्या वतीने वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छतागृह तर सोडाच पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे.

याबाबत नगरपरिषद चे मुख्याधिकारी संदीप चिद्रावार यांनी सांगितले की,"भाजीपाला व्यवसायिक,पथारीवाले, यांच्यावर आम्ही कारवाई करतो परंतु ते लोक पुन्हा अतिक्रमण करून बसतात. त्यामुळे पदपथ या लोकांच्या अतिक्रमणामुळे व्यापला आहे हे खरे आहे. चाकणच्या मराठी शाळेजवळ पदपथ अतिक्रमणाने व्यापला आहे. विद्यार्थ्यांची संख्या तिथे मोठी आहे. त्यामुळे तो पदपथ मोकळा करण्यात येईल ."

Pune News: The footpath disappeared!
Pune News : पुणे जिल्ह्यातील बेघरांना मिळणार हक्काचे घर; १८६७ घरकुलांना मंजुरी

कोणी आवाज उठवत का नाही

चाकण नगर परिषदेच्या अंतर्गत जुन्या पुणे- नाशिक मार्गाला दोन्ही बाजूने तीन कोटी रुपये खर्च करून पदपथ सुमारे दीड किलोमीटर अंतराचा तयार करण्यात आला. त्याच्यावरून नागरिकांना, जेष्ठ नागरिकांना ये जा करता येत नाही. त्यामुळे पदपथ नेमका कोणासाठी हा प्रश्न निर्माण झाला आहे. पदपथ मोकळे झाले पाहिजेत अशी नागरिकांची मागणी आहे. या मागणीकडे कोणी माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरपरिषद प्रशासन अजिबात लक्ष देत नाही असाही आरोप होत आहे.

चाकणच्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेजवळ तर पदपथ व्यवसायिकांनी गिळून टाकला आहे. मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना येण्या -जाण्यासाठी मार्ग नाही. तिथे शाळा भरताना शाळा सुटल्यानंतर मोठी गर्दी होते.त्यामुळे अपघाताची दाट शक्यता आहे.नगरसेवकांचा कालावधी संपला असल्याने कोणी लक्ष देत नाही हे वास्तव आहे. कोणी आवाज का उठवत नाही असा सवाल नागरिकांचा आहे.

Pune News: The footpath disappeared!
Pune News : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बीआरटी ऐवजी स्वतंत्र मार्गिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.