Pune News : तरुण कैद्यांचे नेमके दुखणे काय? येरवडा कारागृहातील नऊ जणांवर महिनोंमहिने ससूनमध्ये उपचार

ससून रुग्णालय परिसरातून दोन कोटी १४ लाख रुपयांचा मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त
yarawada
yarawada sakal
Updated on

पुणे - येरवडा मध्यवर्ती कारागृहातील नऊ कैद्यांवर महिनोंमहिने ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही कैदी दहा-पंधरा दिवस कारागृहात जातात आणि पुन्हा प्रकृती अस्वस्थ झाल्याने रुग्णालयात दाखल होतात. तरुण ते मध्यम वयातील कैद्यांचे नेमके दुखणे काय? याचे निदान करण्यात ससून रुग्णालयातील डॉक्टरांना वेळ का लागत आहे, असा प्रश्न पुढे येत आहे.

ससून रुग्णालयाच्या परिसरात सुमारे दोन कोटी रुपयांच्या ड्रग्जच्या व्यवहारातील आरोपी ललित पाटील याने रुग्णालयातून सोमवारी (ता. २) रात्री पळ काढला. पोलिस आणि रुग्णालय प्रशासन रात्री उशिरापर्यंत त्याची शोधाशोध करत होते. या पार्श्वभूमीवर ससूनमध्ये उपचारासाठी दाखल कैद्यांची माहिती ‘सकाळ’ला विश्वसनीय सूत्रांनी दिली. तरुण कैद्यांचे नेमके दुखणे काय?

त्यावरून हा प्रश्न आता पुढे येत आहे. पाटील याचे वय ३४ वर्षे आहे. त्याला सहा जून २०२३ रोजी दुपारी अडीच वाजता रुग्णालयात दाखल केले. डॉ. एस. एस. ठाकूर यांचे युनिट त्याच्यावर उपचार करत होते. पाटील याला क्षयरोग झाल्याचे निदान झाले आहे. तसेच, त्याला हार्नियादेखील होता. त्याच्या उपचारासाठी पाटील सहा जूनपासून रुग्णालयात दाखल असल्याची माहिती पुढे आली. याबाबत बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्याशी रात्री संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

yarawada
Chh. Sambhaji Nagar : लग्नाचा ‘ऑनलाईन’ वादा, बसला १६ लाखांचा गंडा!

पाटील याच्यासह आणखी आठ कैद्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील काही कैदी ऑगस्टपासून रुग्णालयात आहेत. नेमक्या कोणत्या आजाराच्या उपचारासाठी त्यांना दाखल केले आहे, निदान काय आहे, एवढे दिवस उपचार का लांबला? असे प्रश्न पुढे येत आहेत. उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये फक्त एकाच रुग्णाचे वय ७२ वर्षे आहे. उर्वरित सर्व रुग्ण ३४ ते ४१ वर्षे वयोगटातील असल्याची माहिती मिळाली.

yarawada
Pune News : अवैद्य दारू विक्री दुकानावर महिलांचा मदतीने आळेफाटा पोलिसांनी केली कारवाई

पोलिसांना चकवा देऊन आरोपीचे पलायन

स सून रुग्णालयात उपचार घेत असलेला आरोपी ललित अनिल पाटील (वय ३४) याने पोलिसांना चकवा देऊन पलायन केले. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. पाटील याला सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक्स रे काढण्यासाठी नेण्यात येत होते. त्यावेळी पोलिसांना चकवा देऊन त्याने पलायन केले. या संदर्भात पोलिस आयुक्त रितेश कुमार म्हणाले, ‘‘या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल.’’

अमली पदार्थ बाळगल्याच्या गुन्ह्यात ललित पाटील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयातील वॉड क्रमांक १६ मध्ये ४ जून रोजी दाखल केले होते. परंतु ललित पाटील हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमधील कामगार रौफ रहीम शेख आणि सुभाष जानकी मंडल या दोघांच्या मदतीने मेफेड्रॉन अमली पदार्थ विक्री करीत होता. त्यांच्या ताब्यातून दोन कोटींचे मेफेड्रॉन जप्त केले होते.

ससून रुग्णालय परिसरातून दोन कोटी १४ लाख रुपयांचा मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त केल्या प्रकरणातील मुख्य आरोपीच मेफेड्रॉन तयार करत होता. २०२० मध्ये त्याच्याकडून चाकण येथे १६ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते.

ललित अनिल पाटील (वय ३४) असे या गुन्ह्यातील मुख्य आरोपीचे नाव आहे. त्यावर चाकण येथे गुन्हा दाखल असून तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. सध्या त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ससून रुग्णालयातील कॅन्टीनमधील कर्मचारी आणि अमली पदार्थ बाळगणाऱ्या झारखंड येथील तरुणाला अटक केली आहे. सोमवारी (ता. २) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

yarawada
Solapur : दोन बंदूक, पाच गोळ्यांसह तरुणाला पोलिसांकडून अटक

सुभाष जानकी मंडल (वय २९, रा. देहूरोड, मूळ झारखंड) आणि रौफ रहीम शेख (वय १९, रा. ताडीवाला रस्ता) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रुग्णालयातून सोडल्यानंतर पाटील याला गुन्ह्यात वर्ग करण्यात येणार आहे. पाटील याच्याकडून २०२० मध्ये चाकण येथे १६ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. आजारी असल्याने तो चार जूनपासून ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १६ येथे उपचार घेत आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयास दिली. ससूनमध्ये दाखल असलेल्या इतर कैद्यांच्या मदतीने आरोपींनी काही गैरप्रकार केले आहेत का? याचा तपास करायचा असल्याने पोलिसांनी न्यायालयाकडे आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.