Pune: कल्याणीनगरमध्ये पब कसे ? अजित पवारांना रहिवाशांचा सवाल!

Ajit Pawar:कल्याण नगर भागात मेट्रो स्टेशन कडे जाण्यासाठी मोफत बॅटरी रीक्षा सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
Pune: कल्याणीनगरमध्ये पब कसे ? अजित पवारांना रहिवाशांचा सवाल!
Updated on

Vadgaon Sheri: कल्याणीनगरच्या रहिवासी भागात एवढे पब कसे सुरु झाले आणि याला मान्यता कशी मिळाली, यामागे नेमके कोण आहे, असा थेट सवाल कल्याणीनगर येथील रहिवाशांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला. यासोबतच विमाननगर, खराडी, वडगाव शेरी भागातील समस्यांचा पाढाच सोसायटी पदाधिकाऱ्यांनी पवार यांच्यासमोर वाचला.

जन सन्मान यात्रेनिमित्त अजित पवार यांनी विमाननगर येथे वडगाव शेरी मतदारसंघातील गृहरचना संस्थाचे पदाधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधता. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला अध्यक्ष रूपाली चाकणकर, या संवाद बैठकीचे आयोजक आमदार सुनील टिंगरे उपस्थित होते.

Pune: कल्याणीनगरमध्ये पब कसे ? अजित पवारांना रहिवाशांचा सवाल!
पुणे जिल्ह्यात पावासाचा धुमाकूळ; कुठे, काय परिस्थिती?

विमाननगर भागातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था, रस्त्यावर दारू पिणे, आठ ते दहा दिवस कचरा उचलला जात नाही, वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याची मागाणी अनिता हनुमंते यांनी यावेळी केली.

रिक्षावाल्यांकडून होणारी लूट, क्षेत्रीय अधिकारी उपलब्ध नसणे, रहिवाशी भागात मालमत्ता वापरात बदल करून सुरू झालेले धंदे याविषयी स्वच्छ कल्याणीनगर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांसमोर समस्या मांडल्या. तसेच कल्याण नगर भागात मेट्रो स्टेशन कडे जाण्यासाठी मोफत बॅटरी रीक्षा सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

Pune: कल्याणीनगरमध्ये पब कसे ? अजित पवारांना रहिवाशांचा सवाल!
Bharat Bandh :शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान मंचकडून निदर्शने

यासोबतच प्रभा करपे यांनी खराडीतील नदीवर होणारे अतिक्रमण, अजय बल्लाळ यांनी नागपूर चाळ भागातील जुन्या इमारतींचा पुनर्विकासाचा प्रश्न मांडला। एडवोकेट निलेश शिंदे यांनी शास्त्रीनगर पूरस्थितीची समस्या, वडगाव शेरी भागातील सन सिटी मधील नसरीन एंजर यांनी येथील भटक्या कुत्र्यांची समस्या आणि लहान मुलांवरील हल्ले या विषयी समस्या मांडल्या.

यानंतर अजित पवार यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना सगळ्यांसमोर फोन लावला आणि या भागातील समस्या प्राधान्याने सोडवण्याची सूचना केली. तसेच नगर रस्त्यावरील उर्वरित बीआरटी काढण्याची सूचना केली.

वडगाव शेरी मतदार संघातील समस्या सोडवण्यासाठी लवकरच पुणे महानगरपालिका आयुक्तांसोबत बैठक घेण्यात येईल असे आश्वासन आमदार सुनील टिंगरे यांनी दिले.

--------------

"कुत्र्याचे तर फार भयानक आहे बाबा, काही लोक कोर्टात जातात आणि कोर्टातून कुत्र्याच्या बाजूने निकाल आणतात, अजित दादांचा आयुक्तांसोबत वरील संवाद ऐकून एकच हशा पिकला. त्यानंतर दादांनी सावरून घेत, मी कोणत्याही प्राण्याच्या विरोधात नाही. परंतु प्राण्यांचा त्रास माणसाला नको. अशी भूमिका आयुक्तांकडे मांडली. आणि भटक्या कुत्र्यांवर उपाययोजना करण्याची सूचना केली.

Pune: कल्याणीनगरमध्ये पब कसे ? अजित पवारांना रहिवाशांचा सवाल!
Pune-Satara Traffic: लाडक्या बहिणींसाठी थांबले ट्रक ड्रायव्हर! पुण्यातल्या कार्यक्रमासाठी साताऱ्याजवळ थांबवली अवजड वाहतूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.