पुणे : शिक्षकांविनाच चालताहेत रात्रशाळा!

पाठपुरावा करूनही हंगामी शिक्षकांची भरती नाही
pune
punesakal
Updated on

पुणे : रात्रशाळा व महाविद्यालयात दुबार नोकरी करीत असलेल्या शिक्षकांना तडकाफडकी काढून टाकले आहे. चार वर्षे उलटली तरी अद्याप रात्रशाळांमध्ये पर्यायी शिक्षकांची नियुक्ती केली नाही. अध्यापनास शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे. शिक्षण संचालक, उपसंचालक यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही अर्धवेळ हंगामी शिक्षकांची भरती करण्यास मान्यता दिली नाही. त्यामुळे सध्या शिक्षकांअभावीच रात्रशाळा चालत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पुणे (pune) आणि पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad) शहरात पूना नाईट स्कूल, आबासाहेब अत्रे व चिंतामणी रात्रप्रशाला सुरू आहेत. हॉटेल, गॅरेज, मॉल, दुकाने आदी ठिकाणी काम करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना त्यांचे बंद पडलेले शिक्षण रात्रशाळांमुळे पुन्हा सुरू करता येते. या शाळांमधून शिकणाऱ्या मुलांची संख्याही मोठी आहे. मात्र, सरकारच्या दुर्लक्षितपणामुळे या तिन्ही रात्र शाळा व महाविद्यालयात वीस शिक्षकांची कमतरता आहे. सरकारने रात्र शाळा व महाविद्यालयात दुबार नोकरी करीत असलेल्या शिक्षकांची सेवा सरकारने मे २०१७ मध्ये एका परिपत्रकाद्वारे संपुष्टात आणली.

pune
आशाताईंना सेनेत न्याय मिळाला नाही, भाजप देईल - चंद्रकांत पाटील

केवळ कागदी घोडे

सध्या सरकारकडून ‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरती करण्यात येते. रात्र शाळांमधून दुबार शिक्षक काढून घेतल्यानंतर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे रात्र शाळेमध्ये समायोजन केले जाईल, असे सरकारने स्पष्ट केले होते. त्यानुसार काही जागांवर डी.एड. पात्रताधारक मराठी आणि इतिहास विषयांचे शिक्षक पाठविण्यात आले. मात्र, आठवी ते बारावीसाठीचे इंग्रजी, गणित, विज्ञान विषयाचे बी. एड. चे शिक्षक सरकारकडून उपलब्ध झाले नाहीत. हंगामी स्वरूपाच्या शिक्षक भरतीला परवानगी देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. केवळ कागदी घोडे नाचविण्यापलीकडे काहीच झाले नसल्याने रात्र शाळेच्या शिक्षकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Sakal

रात्रशाळांमध्ये हंगामी शिक्षक भरती करण्यास मान्यता देण्याबाबत संचालकांकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. रिक्त जागांची माहिती मागवून कार्यवाही करण्यात येईल.

- दिगंबर उकिरडे, शिक्षण उपसंचालक

‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षक भरती कधी करणार? तोपर्यंत मुलांनी काय करायचे? रात्र शाळांमध्ये हंगामी शिक्षक भरती करण्यास परवानगी दिली जावी. पाठपुरावा करूनही अंमलबजावणी होत नाही.

- सतीश वाघमारे, प्राचार्य, पूना नाइट स्कूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.