Nikhil Wagle Attack: पुण्यात वागळेंवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी १० जणांवर गुन्हा दाखल; महायुतीचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये हजर

पुण्यात शुक्रवारी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला झाला होता. भापच्या कार्यकर्त्यांनी त्यांची कार फोडली होती.
journalist nikhil wagle attacked by BJP workers not allow India to become pakistan
journalist nikhil wagle attacked by BJP workers not allow India to become pakistanSAkal
Updated on

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या कारची तोडफोड, तसेच त्यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकासह दहा कार्यकर्त्यांविरुद्ध पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी नगरसेवक दीपक पोटे, गणेश घोष, स्वप्नील नाईक, दत्ता सागरे, बापू मानकर, दुष्यंत मोहोळ, गिरीश मानकर, राहुल पायगुडे, गणेश शेलार आणि प्रतीक देसरडा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत श्रद्धा वसंत जाधव (वय २१, रा. मुंढवा) यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (pune nikhil wagle attack case has been registered against 10 people in connection with)

journalist nikhil wagle attacked by BJP workers not allow India to become pakistan
Asduddin Owaisi on Ram: "मी श्रीरामाचा आदर करतो पण...."; ओवैसींची लोकसभेत सरकारवर सडकून टीका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे पर्वती पायथा परिसरात होत असलेली त्यांची सभा उधळून लावण्याचा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला होता. (Marathi Tajya Batmya)

journalist nikhil wagle attacked by BJP workers not allow India to become pakistan
What is CAA : काय आहे सीएए? लागू झाल्यानंतर देशभरात होतील 'हे' बदल

या सभेचे आयोजन विविध पुरोगामी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले होते. वागळे आणि सहकारी शुक्रवारी सायंकाळी डेक्कन जिमखाना भागातून कार्यक्रमाच्या ठिकाणी जात होते. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांची कार खंडोजीबाबा चौकात अडवली व घोषणाबाजी केली. त्यानंतर शास्त्री रस्त्यावरील सेनादत्त पोलिस चौक ते मांगीरबाबा चौक दरम्यान कार अडवून भाजप कार्यकर्त्यांनी काचा फोडल्या आणि शाईफेक केली, असे जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. (Latest Marathi News)

journalist nikhil wagle attacked by BJP workers not allow India to become pakistan
Nashik Scam Alert : सायबर स्कॅमर कडून वीज ग्राहकांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ

जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन; २५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

सभेवरून झालेल्या गोंधळामुळे जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी २०० ते २५० सर्वपक्षीय कार्यकर्त्यांवर पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यासह २०० ते २५० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. पोलिस शिपाई अनिरुद्ध आनेराव यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.