Life Imprisonment : हिंदू राष्ट्र सेनेच्या नऊ कार्यकर्त्यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

पूर्ववैमनस्यातून माथाडी कामगार नेते प्रकाश नारायण गोंधळे यांचा धारदार शस्त्रांनी वार करून खून केल्याप्रकरणी हिंदू राष्ट्रसेनेच्या नऊ जणांना न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
 court
courtsakal
Updated on
Summary

पूर्ववैमनस्यातून माथाडी कामगार नेते प्रकाश नारायण गोंधळे यांचा धारदार शस्त्रांनी वार करून खून केल्याप्रकरणी हिंदू राष्ट्रसेनेच्या नऊ जणांना न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

पुणे - पूर्ववैमनस्यातून माथाडी कामगार नेते प्रकाश नारायण गोंधळे यांचा धारदार शस्त्रांनी वार करून खून केल्याप्रकरणी हिंदू राष्ट्रसेनेच्या नऊ जणांना न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप आणि प्रत्येक २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी हा निकाल दिला.

हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते विकी जाधव, वैभव भाडळे, अक्षय इंगुळकर, श्रीकांत आटोळे, अमोल शेगडे, राहुल कौले, विकी पाटील, सूरज फडके आणि आकाश शिंदे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. आठ जुलै २०१३ मध्ये गोंधळे यांचा खून झाला होता. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. जून २०१३ मध्ये गोंधळे यांच्या घरावर हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. हल्लेखोरांनी गोंधळे यांच्या दरवाजावर पेट्रोल टाकून तो जाळला. तसेच घरात घुसत घरगुती वस्तुंचे नुकसान केले होते. या प्रकरणाची फिर्याद गोंधळे हडपसर पोलिस ठाण्यात दिली होती.

खुनाच्या घटनेच्या दिवशी रात्री अकराच्या सुमारास गोंधळे हे नेहमीप्रमाणे रेशनिंग दुकानातून घरी चालले होते. आरोपींनी त्यांना अडवून त्यांच्यावर कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला केला. त्या हल्ल्यामध्ये गोंधळे यांचा मृत्यू झाला होता. याबाबत राजेंद्र पिंगळे यांनी फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर फिर्यादी, साक्षीदार, पंच यांना खटल्यात लक्ष घालू नका, अशा प्रकारच्या धमक्या येत होत्या, अशी माहिती त्यांनी साक्ष दरम्यान दिली. निकाल देताना न्यायालयाने प्रत्येक गुन्हेगाराला २० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाच्या रकमेतून एक लाख ५० हजार रुपये गोंधळे यांच्या कुटुंबीयांना द्यावे, असे आदेशात नमूद केले.

पंच साक्षीदारांवर टाकण्यात आला होता दबाव -

खटल्याचे कामकाज चालू असताना १८ जानेवारी २०२० रोजी फिर्यादी राजेंद्र पिंगळे यांनी फियार्दी साक्ष देऊ नये म्हणून त्यांचा मुलगा ऋषिकेश पिंगळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात होता. न्यायालयात आलेले पंच आणि साक्षीदारांवर सुद्धा आरोपी आणि त्यांच्या मित्रांकडून दबाव टाकण्यात आला होता. गोंधळे यांच्यावर केलेला हल्ला हा अतिशय क्रूर आहे, असा युक्तिवाद ॲड. निकम यांनी केला. गुन्हा सिद्ध करण्यासाठी ॲड. निकम यांनी एकूण १९ साक्षीदार तपासले. ॲड. निकम यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने सर्व आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.