Pune : दफनभूमीच्या मार्गात जाण्याकरिता नागरिकांना अडथळा

चिखल, पाण्याचे डबके, वायरिंगचे बंडल व चेंबरच्या वाकलेल्या व झाकणामुळे नागरिक झाले त्रस्त
Pune
Punesakal
Updated on

मोहीनी मोहीते

Pune - नायडू हॉस्पिटल च्या मागील बाजूस मुस्लिम व ख्रिश्चन समाजाची दफनभूमी आहे. या ठिकाणी मृतदेह अंत्यविधी करिता नेताना शवावहिका वाहनांसह पायी चालताना ही नातेवाईक व नागरिकांना मोठी कसरत करावी लागते.

चेंबर वरील झाकण तुटलेल्या व वाकलेल्या अवस्थेत पडून आहे. चिखल, पाण्याचे डबके साठल्याने व विद्युत वायरिंगचे बंडल हे सर्व रस्त्याच्या मधोमध टाकण्यात आले आहे.

तसेच सर्वत्र चिखलमय वातावरण झाल्याने अनेक वाहने घसरून छोट्या मोठ्या अपघतांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

Pune
Mumbai News : आली लहर केला कहर! पठ्ठ्याने ट्रक थेट समुद्रातच घुसवला

या दफनभूमी शेजारीच पुणे महानगरपालिकेतील मध्यवर्ती कोठीचे कार्यालय नायडू कंपाउंड मध्ये असून त्याठिकाणी राडारोडा पडलेला आहे.

यासंबंधित अनेकदा मध्यवर्ती कार्यालयाचे अधिकारी व ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाचे दोन्ही विभागतील अधिकारी यांना लेखी व तोंडी निवेदन देऊनही जाणीवपूर्वक या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार एमआयएम पक्षातील पुणे कँटोन्मेंट मतदार संघातील अध्यक्ष विलास कांबळे यांनी केली आहे.

Pune
Mumbai : मुंबईतील पर्यटनस्थळांवर गर्दी वाढली! राष्ट्रीय उद्यानाला ४ दिवसांत ६ हजार नागरिकांची भेट

यासंदर्भात ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या कनिष्ठ अभियंता भाग्यश्री देवकर म्हणाल्या की, तक्रारीची दखल घेऊन त्वरित चेंबर वरील झाकण दुरुस्त करण्यात आले आहे. वायरिंग चे बंडल संदर्भात विद्युत विभागाला कळविले जाईल. येथील रस्ता कच्चा असून पावसामुळे माती रस्त्याच्या वर येत असते. त्यामुळे चिखलचे प्रमाण वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.