Pune Weather : पुणे परिसरात ‘ऑक्टोबर हीट’ कायम

सोमवारी राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद जळगाव येथे ३७ अंश सेल्सिअस इतकी झाली.
pune october heat temperature rise Pune Weather imd marathi news
pune october heat temperature rise Pune Weather imd marathi newsSakal
Updated on

पुणे : शहर आणि परिसरातील कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या वर नोंदला जात असून, अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होत आहे. पुढील पाच दिवस शहर आणि परिसरात मुख्यतः निरभ्र वातावरण कायम राहणार आहे, असे हवामानशास्त्र विभागाने वर्तविले आहे. त्यामुळे ‘ऑक्टोबर हीट’चा चटका कायम राहणार आहे.

शहरात सोमवारी (ता. १६) ३४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सरासरीपेक्षा २.३ अंशांनी वाढ कायम आहे. किमान तापमान २०.९ अंशांवर पोहोचले आहे. यंदा मॉन्सूनची कामगिरी सरासरी इतकी होती. त्यात वेळेआधीच पुण्यासह जवळपास संपूर्ण राज्याचा निरोप घेतल्याने कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उष्ण वातावरणाच्या प्रभावामुळे अंगाची लाही लाही होत आहे. ही स्थिती तूर्तास अशीच कायम राहण्याची शक्यता आहे.

दक्षिण कोकणात पावसाने हजेरी लावली आहे. पावसासाठी पोषक वातावरण झाल्याने मंगळवारी (ता. १७) मध्य महाराष्ट्र व कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोमवारी राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद जळगाव येथे ३७ अंश सेल्सिअस इतकी झाली. अकोला, ब्रह्मपुरी, सोलापूर, वाशीम येथेही पारा ३६ अंशांच्या पुढे गेला आहे. मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने पुढील दोन दिवसांत पूर्वोत्तर राज्यासह दक्षिण आणि पूर्व भारतातील आणखी काही भागांतून बाहेर पडण्याचा अंदाज आहे.

येथे पावसाची शक्यता : सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.