Ganeshotsav : १५ दिवसांवर आला आहे. लाडक्या गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी लगबग सुरू आहे. मंडप, सजावट, आरास, मूर्ती, नैवेद्यासाठीच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे.
महापालिकेचे नियम
उत्सव मंडप, स्वागतकमानी आणि रनिंग मंडपासाठी २०१९ मध्ये दिलेली परवानगी ग्राह्य धरणार
यंदा प्रथमच उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना परवाना काढावा लागणार आहे; मात्र महापालिका विनाशुल्क परवाना देणार
४० फुटांपेक्षा अधिक उंचीचा मंडप करायचा असल्यास अधिकृत स्थापत्य अभियंत्याकडून स्थिरता प्रमाणपत्र घ्यावे लागणार
मंडप आणि स्वागतकमानी करताना अग्निशमन वाहन, रुग्णवाहिका तसेच रहदारीसाठी रस्ता मोकळा ठेवावा लागणार
कमानीची उंची रस्त्यापासून
१८ फुटांपेक्षा अधिक असावी
विसर्जनानंतर तीन दिवसांच्या आत मंडप, स्टेज कमान, रनिंग मंडप काढून रस्ता मोकळा करावा
रस्त्यावरील खड्डे सिमेंट-काँक्रिटमध्ये बुजवून रस्ता पूर्ववत करणे बंधनकारक
पुणे स्वारगेट गणेशोत्सव, गोपाळकाला, नवरात्रोत्सव जवळ आल्याने मंडप व्यवसायात सुगी आहे. बहुतांश मंडळांचे मंडप उभे करण्याचे काम सुरू झाले आहे, तर काहींचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. महापालिकेने दिलेल्या नियमांचे पालन करून हे काम करण्याचा मंडळांचा प्रयत्न आहे.
शहरात मंडळांची संख्या तीन हजारांपेक्षा अधिक आहे. गणेशोत्सवापूर्वी एक महिना अगोदरच मंडप उभा करण्याचे काम सुरू होते. देखावा व सजावटीसाठी मंडप गरजेचा असतो. उंची, रुंदी, स्टेजवरील वजनाचा विचार करून मंडपाची बांधणी केली जाते. रस्त्यावर मंडप उभा करण्यासाठी मंडळांना विशेष मेहनत घ्यावी लागते. पादचारी, वाहनचालकांना कमीत कमी अडथळा होईल, याची मंडप व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल
काळजी घेऊन काम केले जात आहे.
खड्डेविरहित मंडप
मंडप व्यावसायिक दोन महिन्यांपासून उत्सवाची तयारी करत आहेत. पारंपरिकसह फायबर मंडपाला मंडळांची पसंती मिळत आहे. भक्कमपणासाठी स्टीलच्या स्टँडचा वापर होत आहे. यंदा खड्डेविरहित मंडपाकडे मंडळांचा कल असल्याचे दिसून येते.
सुरक्षितता महत्त्वाची ः
मंडपाच्या कामावेळी नागरिकांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन काम करावे लागते. मंडप टाकताना अवजड गोष्टी उचलून नेणे धोक्याचे असते. त्यासाठी क्रेनचा वापर केला जातो. तसेच कारागिरांनाही हेल्मेट घालून आणि सेफ्टी बेल्ट लावून काम करण्यास सांगितले जाते.
किमतीत वाढ
यंदा मंडपाच्या किमतीत गेल्या वर्षापेक्षा २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. इंधन दरवाढ, कामगारांच्या वाढलेल्या मजुरीचा परिणाम मंडपाच्या किमतींवर झाला आहे. तसेच बांबू, पत्रे, कापड, प्लायवूडचे भाडेही वाढले आहे. यंदा २५ हजार ते २५ लाख रुपयांपर्यंत मंडप उपलब्ध आहेत.
मंडळांची कार्यपद्धती काळानुसार बदलली आहे. आर्थिक नियोजन करण्यासाठी मंडळे रनिंग मंडप आणि कमानींना प्राधान्य देत आहेत. मंडळांचा उत्साह कायम असून आम्ही सुरक्षेची काळजी घेऊन काम सुरू केले आहे.
- दीपक दाते, दाते अँड कंपनी, मंडप व्यावसायिक
कोरोनानंतर विविध गणेश मंडळे उत्साहाने तयारीला लागली आहेत. मंडप टाकताना सुरक्षिततेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. पालिकेने दिलेल्या नियमानुसार मंडपाचे काम सुरू आहे.
- विकास काळे, काळे अँड सन्स, मंडप व्यावसायिक
नागरिकांना मंडपाचा अडथळा होणार नाही, याची काळजी गणेश मंडळांनी घेतली आहे. अनेक मंडळांचे पूजन होऊन काम सुरू झाले आहे. नागरिकांना कार्यकर्ते सहकार्य करत असून ही सकारात्मक बाब आहे.
- शिरीष मोहिते, अध्यक्ष, सेवा मित्र मंडळ ट्रस्ट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.