Pune : विहिरीमध्ये पडलेल्या चार मजुरापैकी एका मजुराचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला; पण...

घटनेनंतर रात्री लगेच बचाव कार्याला सुरवात झाली...
Pune
PuneSakal
Updated on

म्हसोबाचीवाडी ता.इंदापूर - १२० फुट खोल विहिरीमध्ये पडलेल्या चार मजुरापैकी एका मजुराचा मृतदेह आज सकाळी साडेदहाच्या सुमारास सापडला असून उवरित तिघांची शोध मोहिम सुरु आहे.

म्हसोबाचीवाडी येथे विहिरीला रिंग (सिमेंटक्रॉक्रिटीकरण चा कठडा) तयार करण्याचे काम सुरु असताना मंगळवार (ता.१) रोजी दुपारनंतर अचानक मुरुम व मातीचा ढिगारा कोसळल्याने चार मजूर विहिरीतील मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची घटना घडली.

Pune
Mumbai : केडीएमसी फेल, 27 गावे बाहेर काढा; आमदार राजू पाटील यांची मागणी

घटनेनंतर रात्री लगेच बचाव कार्याला सुरवात झाली.

गेल्या तीन दिवसापासून बचाव कार्य सुरु होते.विहिरीची खोली जास्त असल्यामुळे बचाव कार्याला अडचण येत होती.

Pune
Mumbai : केडीएमसी फेल, 27 गावे बाहेर काढा; आमदार राजू पाटील यांची मागणी

माती व मुरुमाच्या ढिगाऱ्याखाली सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय ३२), जावेद अकबर मुलाणी ( वय ३०, मूळ रा.बेलवाडी, हल्ली रा. निंबोडी), परशुराम बनसीलाल चव्हाण (वय ३०), व लक्ष्मण उर्फ मनोहर मारुती सावंत (वय ५५) चौघेजण अडकले होते.

आज सकाळी चौघांचा शोध सुरु केल्यानंतर सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका मजुराचा मृतदेह सुमारे ६५ तासानंतर एनडीआरएफ जवानांना मिळाला. उवरित तिघांची शोध मोहिम सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.