पुण्यातल्या पाषाण तलावावर जोडप्यांना बंदी नसल्याच्या बातम्या दोन दिवसांपासून व्हायरल होत होता. या अजब फतव्यामुळे पुणेकरांमधून संतप्त प्रतिक्रियाही उमटत होत्या. मात्र आता महानगरपालिकेने आपला हा निर्णय मागे घेतला आहे.
पुण्यातल्या पाषाण तलावाच्या गेटवर लावलेला "Couple not allowed" चा फलक महापालिकेने उतरवला आहे. पुणे महानगरपालिकेने अविवाहित जोडप्यांना या परिसरात येण्यास मनाई केली होती. त्यासाठी हा फलक लावण्यात आला होता.
या निर्णयाला राईट टू लव्ह या संघटनेच्या वतीने विरोध करण्यात आला होता. हा निर्णय मागे घ्यावा, अशा मागणीचं निवेदन पालिका आयुक्तांना आणि उद्यान विभागाचे अधीक्षक अशोक घोरपडे यांना दिले होते. त्यानंतर हा निर्णय मागं घेण्यात आला. आणि हा फलक आता काढून टाकण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.