Pune : सिंहगडावर पुन्हा ई-बस सुरू करण्याच्या हालचालींना वेग; पीएमपीएमएलच्या पथकाने केली घाट रस्त्याची पाहणी

आता पुन्हा एकदा सिंहगडावर जाण्यासाठी ई-बस सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असून आज पीएमपीएमएलचे पथक व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घाट रस्त्याची पाहणी केली.
Pune
Punesakal
Updated on

Pune - सिंहगडावर जाण्यासाठी खाजगी वाहनांना बंदी घालून पुन्हा एकदा ई-बस सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मागील आठवड्यात वन विभाग व पीएमपीएमएल प्रशासनाची याबाबत संयुक्त बैठक झाली होती, त्यानुसार आज पीएमपीएमएल च्या पथकाने ई-बससह सिंहगड घाट रस्त्याची पाहणी केली आहे.

रस्ता, चार्जिंग स्टेशन, संरक्षक भिंत दुरुस्ती अशा पायाभूत सुविधांच्या उभारणीनंतरच ई-बस सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी दिली आहे.

Pune
Mumbai : रेल्वेचे ईमर्जन्सी ब्रेक कसे दाबायचे ? लोको पायलटच्या ट्रेनिंगसाठी CSMT मध्ये खास मशीन

महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी सिंहगडावर ई-बस सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सिंहगडावर ई-बससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले, डोणजे येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. वाहनांमुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी दुचाकी, चारचाकी वाहनांना गडावर जाण्यास बंदी घालण्यात आली होती. पर्तटकांचा या ई-बसला मोठा प्रतिसाद मिळत होता.

Pune
Mumbai : मुंबई महापालिका शाळेत शिपाईची १७९७ पदे रिक्त! तात्काळ पदभरतीची मागणी

मात्र अरुंद घाटरस्ता, वारंवार कोसळणाऱ्या दरडी, अपुरे चार्जिंग स्टेशन, अपुरी बसची संख्या, सातत्याने होणारे अपघात आणि त्यामुळे पर्यटकांच्या जीवाला निर्माण झालेला धोका या गोष्टींचा विचार करून काही दिवसांतच तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी ई-बस बंद करण्याचे आदेश दिले होते.

आता पुन्हा एकदा सिंहगडावर जाण्यासाठी ई-बस सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असून आज पीएमपीएमएलचे पथक व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घाट रस्त्याची पाहणी केली. योग्य रस्ता व पुरेसे चार्जिंग स्टेशन तयार झाल्याशिवाय ई-बस सुरू करण्यात येणार नसल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पडलेली संरक्षक भिंत अद्यापही तशीच! सिंहगडावरील गाडीतळाजवळ शेवटच्या टप्प्यात असलेल्या तीव्र वळणावर मागील वर्षी पर्यटकांनी खचाखच भरलेली ई-बस संरक्षक भिंतीवर आदळली होती.

Pune
Mumbai : मुंबई महापालिका शाळेत शिपाईची १७९७ पदे रिक्त! तात्काळ पदभरतीची मागणी

सुदैवाने ही बस भींतीला आदळून थांबली अन्यथा पन्नास ते साठ पर्यटकांचे प्राण गेले असते. त्यावेळी पडलेली संरक्षक भिंत अद्यापही तशीच असून धोकादायक वळण असताना प्रशासनाने या भिंतीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. आता पुन्हा ई-बसचा 'प्रयोग' करताना प्रशासनाने अगोदर पर्यटकांच्या सुरक्षेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज आहे.

Pune
Mumbai News : नालेसफाई नव्हे तर निव्वळ 'हाथ की सफाई'; वर्षा गायकवाड यांचा आरोप

"अगोदर नऊ मीटर लांबीची बस होती, आता सात मीटर लांबीची बस असणार आहे. आज अधिकाऱ्यांनी घाट रस्त्याची पाहणी केली आहे. काही ठिकाणी रस्त्याचे काम करावे लागणार आहे. तसेच आणखी चार्जिंग स्टेशन उभारावे लागणार आहेत. बसची संख्या पर्यटकांच्या संख्येचा विचार करून पुरेशा प्रमाणात ठेवण्यात येणार आहे मात्र सर्व पायाभूत सुविधांची उभारणी झाल्याशिवाय ई-बस सुरू करण्यात येणार नाही." ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()