पुणे : वानवडी परिसरातील बल्लुसिंग टाक (ballusing tak gang) याच्या टोळीविरुद्ध पुणे पोलिसांनी (pune police) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (amitabh gupta) यांच्या 11 महिन्यांच्या कारकीर्दीत 'मोका'अंतर्गत झालेली ही 50 वी कारवाई आहे.
बल्लुसिंग प्रभुसिंग टाक, उजालासिंग पभूसिंग टाक (दोघेही रा. रामटेकडी), सोमनाथ नामदेव घारोळे (रा. म्हाडा वसाहत, हडपसर), पिल्लुसिंग कालुसिंग जुन्नी (रा.गोसावीवस्ती, हडपसर), जलसिंग रजपुतसिंग दुधानी (रा.रामटेकडी, वानवडी), गोरखसिंग गागासिंग टाक (रा.बिराजदार वस्ती,हडपसर) असे कारवाई झालेल्यांची नावे आहेत. आरोपींनी 5 जुलैला पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास कोथरुड येथील धारदार शस्त्रे जवळ बाळगून पंचरत्न सोसायटीमध्ये दरोडा टाकला.
त्यानंतर तेथून पळून जात असताना पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी पोलिसांवर हल्ला चढविला होता. याप्रकरणी कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बल्लुसिंग टाक व त्याचे साथीदार हे संघटीत गुन्हेगारी चालवून 2008 पासून गंभीर स्वरुपाचे शरिर व मालमत्तेविरुद्ध करीत आहेत. बल्लुसिंग टाक याने गुन्हे करताना वेगवेगळे साथादार समवेत घेऊन टोळीची दहशत व वर्चस्व निर्माण करण्याकरीता दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्रे बाळगुन दहशत निर्माण करणे यांसारखे गंभीर गुन्हे केले आहेत.
यापुर्वी त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तरीही त्यांच्या वर्तनात फरक पडला नाही.त्यामुळे त्यांच्यावर ठोस कारवाई करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध "मोका' अंतर्गत कारवाई करण्यात यावी, याबाबतचा प्रस्ताव कोथरुड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांनी तत्कालीन अतिरीक्त पोलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी या प्रस्तावाची पडताळणी करून त्यास मंजुरी दिली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या 11 महिन्यांच्या कारकीर्दीत "मोका' अंतर्गत झालेली हि 50 वी कारवाई आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे करीत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.