Pune Porsche Accident: नवे खुलासे, नवी कलमं! पुणे कारअपघात प्रकरणी नव्या गुन्ह्यांची नोंद

या प्रकरणात दिवसेंदिवस नवे खुलासे होत आहेत.
Pune Porsche Accident
Pune Porsche AccidentEsakal
Updated on

Pune Porsche Accident: पुण्यात भरधाव कार चालवून दोन तरुणांचा जागीच जीव घेणाऱ्या प्रकरण आता चांगलंच तापलं आहे. दिवसेंदिवस यामध्ये नवे खुलासे होत आहेत, त्यानुसार गुन्ह्यांच्या कलमांमध्ये देखील वाढ होत असल्याचं चित्र आहे. आज पुन्हा पोलीस पोलिसांनी नव्यानं काही कलमं यामध्ये वाढवली आहेत. (Pune Police adds section 420 of the IPC along with Sections 65(e) and 18 against Vishal Agrawal Bar owners and Managers)

पुणे पोलिसांनी एफआयआरमध्ये नव्यानं समाविष्ट केलेल्या कलमांमध्ये भादंवि कलम ४२० चा समावेश केला आहे. तसेच कलम ६५ (ई) आणि कलम १८ यांचा समावेश केला आहे. यांपैकी कलम ४२० हे फसवणूक प्रकरणाचं कलम असून ६५ ई हे कलम दंड आणि शिक्षा यासाठी आहे. तर कलम १८ हे दहशतवादी कृत्य करणं किंवा त्याला पाठिंबा देणं यासाठी हे कलम आहे.

Pune Porsche Accident
Arvind Kejriwal: "केजरीवालांच्या निवासस्थानी घडलं 'द्रौपदीचं वस्त्रहरण'"; भाजपच्या नेत्याचं वादग्रस्त विधान

नव्यानं वाढवलेली ही कलमं प्रमुख अल्पवयीन आरोपीचे वडील, बार मालक आणि व्यवस्थापक यांच्याविरोधात दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळं आता या आरोपींविरोधातील फास अधिक आवळण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.