पुणेकरांनो सकाळी 11 नंतर घराबाहेर पडू नका, अन्यथा

Six days of strict lockdown from today
Six days of strict lockdown from todayfile photo
Updated on

पुणे (pune)- शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. असे असले तरी सक्रिय रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पुण्यात लॉकडाऊनची (corona Lockdown) अधिक कठोर अंमलबजावणी करणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त (police commissioner) अमिताभ गुप्ता (amitabh gupta ) यांनी दिली. लॉकडाऊनचे शहरात चांगले परिणाम दिसून येत आहेत. सध्या सकाळी ११ पर्यंत अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याची मुभा आहे. पण, रुग्णसंख्या आणखी कमी करण्यासाठी दुपारी बारा वाजल्यापासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलंय. (pune police commissioner amitabh gupta corona Lockdown news)

कोर्टात सांगण्यात आलेल्या आकडेवारीचा हवाला देत न्यायमूर्तींनी पुण्यात लॉकडाऊन करण्याचा गांभीर्याने विचार करण्याचे निर्देश दिले होते. यापार्श्वभूमीवर पोलिसांकडून नाकाबंदीची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सह पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी विविध ठिकाणच्या नाकाबंदीची पाहणी करत आहेत.

Six days of strict lockdown from today
पुण्यात माणुसकीला काळीमा! बिलासाठी चिमुकल्याचा मृतदेह 4 दिवस रुग्णालयातच

सध्या सकाळी ७ ते ११ पर्यंत लोकांना अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यास मोकळीक आहे. असे असले तरी लोक यावेळेनंतरही बाहेर फिरताना दिसत आहेत. खासगी वाहनांचा वापर वाढला आहे. पोलिस नाकाबंदी करुन अशा लोकांना अडवतात, पण अनेकदा वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. रस्त्यावर फिरणाऱ्या प्रत्येक नागरिकाची चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. दुपारी बारानंतर विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची तपासणी केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता असल्यासंच घराबाहेर निघावं, असं अमिताभ गुप्ता म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.