पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना बजावलेली कारणे दाखवा नोटीस नोटीस घेण्यासाठी कोणीही न आल्याने, पोलिसांनी ही नोटीस खेडकरांच्या घराबाहेर चिकटली आहे.
मनोरमा खेडकर यांना त्यांचा बंदुकीचा परवाना का रद्द करू नये, याचे उत्तर द्यावे लागेल, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. 10 दिवसांत उत्तर द्यावे असे यामध्ये सांगण्यात आले आहे.
मनोरमा खेडकर व इतरांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्याच्या तक्रारीवरून पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूजा खेडकरच्या आईचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल होता, ज्यामध्ये ती काही लोकांना बंदूक दाखवून धमकावताना दिसत आहे, हा व्हिडिओ 2023 चा आहे, ज्यामध्ये मनोरमा खेडकर हातात बंदूक घेऊन काही लोकांना धमकावत आहेत.
वास्तविक हे प्रकरण शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याच्या प्रयत्नाशी संबंधित आहे. जमिनीचा ताबा देण्याबाबत खेडकर शेतकऱ्याला धमकावत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध कलम ३२३, ५०४, ५०६, १४३, १४४, १४७, १४८ आणि १४९ तसेच शस्त्रास्त्र कायद्यानुसार एफआयआर नोंदवला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी महिला मनोरमा खेडकर असल्याचा दावा केला जात आहे. हातात बंदूक घेऊन एका व्यक्तीकडे ती आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहे.
व्हिडिओनुसार मनोरमा यांच्या आजूबाजूला अनेक लोक उपस्थित आहेत आणि ती त्या व्यक्तीला हातात बंदूक घेऊन दाखवत आहे.
मनोरमा म्हणाल्या, 'मला सातबारा दाखवा. जमिनीच्या कागदपत्रात माझे नाव आहे. त्यावर समोरची व्यक्ती जमिनीच्या कागदपत्रांवर आपले नाव असून प्रकरण न्यायालयात असल्याचे उत्तर देते.
या प्रकरणात शेतकऱ्यांनी पुण्यातील पौड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्याचाही प्रयत्न केला होता, परंतु तेथे त्यांची दखल घेतली नाही, असा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.
पूजा खेडकर ही २०२३ च्या बॅचची आयएएस अधिकारी आहे. पुण्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून काम करत असताना पूजा काही वादांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. वादानंतर तिची वाशिम येथे बदली करण्यात आली आहे.
पूजा खेडकर अलीकडच्या काळात तिच्या मागण्या आणि कृतींमुळे चर्चेत आहे. वास्तविक, पुण्यात प्रोबेशन आयएएस अधिकारी म्हणून काम करत असताना अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप पूजावर आहे.
प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना मिळत नाहीत त्या सुविधांची मागणी पूजा कार्यालयात करायची. एवढेच नाही तर पूजाने तिच्या वैयक्तिक ऑडीवर लाल दिवाही लावला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.