Pune Crime: खून करुन नऊ महिने होता फरार, फुटपाथवर थांबला अन्...

Latest Pune News: अभिषेक राठोड याच्यावरही अनेक गंभीर गुन्हे दाखल होते
Crime
CrimeEsakal
Updated on

Vishrantwadi: जुन्या भांडणाच्या कारणावरून सराईत गुन्हेगाराचा खून करून गेले नऊ महिने फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट 4 ला यश मिळाले आहे. ओम रामचंद्र गोरे (वय 20, रा. जयप्रकाशनगर, येरवडा) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

अभिषेक राठोड (वय 22, रा. जयप्रकाशनगर, येरवडा) याचा 1 नोव्हेबर 2023 रोजी वडगावशेरी येथील ब्रह्मा सनसिटीजवळ निर्घृण खून करण्यात आला होता. अभिषेक राठोड याच्यावरही अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. दाद्या पाटोळे व इतरांबरोबर झाली होती.

Crime
Pune Crime: कुसाळकर टोळीतील अठरा महिन्यांपासून फरारी गुन्हेगार गजाआड

जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी अभिषेकवर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला होता. या प्रकरणामध्ये पोलिसांनी काही जणांना अटक केली होती. तेव्हापासून ओम गोरे हा फरार होता.

या खुनाच्या गुन्ह्याचा तपास येरवडा पोलिसांसह युनिट 4 चे पथक समांतरपणे करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार राहुल परदेशी यांना त्यांच्या ओम गोरे हा वाडिया बंगल्याजवळील फुटपाथवर थांबला असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन ओम गोरे याला ताब्यात घेतले. त्याने खुनामध्ये सहभागी असल्याची कबुली दिली आहे.

Crime
Pune Crime : कामाचे पैसे थकल्याने डीपीवर महिलेचा फोटो ठेवून अश्लील मजकूर लिहिला; सोशल मीडियावर केली बदनामी

पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त अमोल इेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, वैभव मगदूम, पोलीस अंमलदार हरीश मोरे. प्रवीण भालचिम, संजय आढारी, विशाल गाडे, एकनाथ जोशी, नागेसिंग कुंवर, विनोद महाजन, जहांगीर पठाण, वैभव रणपिसे, राहुल परदेशी, विशाल इथापे, देविदास वांढरे, शीतल शिंदे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.