शिक्षेचे रेकॉर्ड नष्ट करून राष्ट्रपती पदकासाठी प्रयत्न; पोलिसाला अटक

पोलिसासह चार जणांविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
 अटक
अटक sakal
Updated on

पुणे : राष्ट्रपती पदक मिळविण्यासाठी एका पोलिस कर्मचाऱ्याने सेवापुस्तिकेमध्ये खाडाखोड करून तसेच बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार गणेश जगताप याच्यासह चौघांविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश अशोक जगताप असे अटक केलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. त्याच्यासह परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त कार्यालयातील कनिष्ठ लिपीक नितेश अरविंद आयनुर, पोलिस आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ लिपीक रवींद्र धोंडीबा बांदल, वानवडी पोलिस ठाण्यात 2019 मध्ये नेमणुकीस असलेले डे बुक अंमलदार व जगताप याच्या साथीदारांविरुद्ध शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त कार्यालयातील वरिष्ठ लिपीक संतोष भोसले यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 अटक
छातीवर वार करुन दोघांची केली होती हत्या; आरोपीस दुहेरी जन्मठेप

हा प्रकार 26 जुलै 2017 ते 29 जानेवारी 2020 या कालावधीत परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त कार्यालयात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश जगताप हा 2017 ते 2020 या कालावधीमध्ये वानवडी पोलिस ठाण्यात नेमणुकीस होता. त्याने कामात कसूर केल्याबद्दल त्याची दोन वर्षे वेतनवाढ रोखण्याची शिक्षा त्यास 13 फेब्रुवारी 2018 ला देण्यात आली होती. दरम्यान, जगताप यास राष्ट्रपती पदक प्राप्त करायचे होते, परंतु, राष्ट्रपती पदक प्राप्त करण्यासाठी सेवा कार्यकाळात कोणत्याही प्रकारची शिक्षा झालेली असू नये, अशी अट आहे.

त्यामुळे जगताप यास राष्ट्रपती पदक मिळविण्यासाठी कनिष्ठ लिपीक आयनुर व वरिष्ठ लिपी रवींद्र बांदल यांच्या साथीने कट रचला. त्यांनी सेवा पुस्तिकेतील नोंदीचे बनावटीकरण केले. त्यानंतर खोटे दस्तावर स्वाक्षरी करुन, सरकारी शिक्‍क्‍यांचा गैरवापर करुन दोन वर्ष वेतनवाढ रोखण्याची झालेल्या शिक्षेची सरकारी दस्तऐवज व पुरावे नष्ट करुन स्वतःचा फायदा करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, जगताप याच बनावट कागदपत्रांद्वारे मागील काही वर्षांपासून राष्ट्रपती पदकासाठी अर्ज करीत होता. या प्रकरणाची चौकशी करीत असतानाच, त्याच्या सेवापुस्तिकेमध्ये दुसरे पान जोडलेले आढळून आले. त्यानुसार, पोलिसांनी जगतापसह आयनुर, बांदल,जगतापला झालेल्या शिक्षेची अंमलबजावणी न करणारा वानवडी पोलिस ठाण्याचा तत्कालीन डे बुक पोलिस कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच सध्या विशेष शाखेत नेमणुकीस असलेल्या जगताप यास अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक हरिश्‍चंद्र केंजळे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.