पुणे : ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलिसांनी वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठविला आहे. तसेच, तिघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कलमात वाढ केल्याने त्यांची ‘एसीबी’कडून चौकशी होण्याची शक्यता आहे.
अतिवरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, डॉ. तावरे आणि डॉ. हाळनोर या दोघांचे निलंबन करण्याबाबत पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच, पोलिसांनी डॉ. तावरे, डॉ. हाळनोर आणि कर्मचारी अतुल घटकांबळे या तिघांविरुद्ध दाखल गुन्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये कलमवाढ केली आहे.
या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी झाल्यास अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे. तसेच, निलंबनाच्या प्रस्तावाबाबत वैद्यकीय विभागाकडून लवकरच निर्णय होणे अपेक्षित आहे.
दरम्यान, पोलिस आयुक्तांनी अकस्मात मृत्यूच्या गुन्ह्यांच्या प्रलंबित तपासाचा नुकताच आढावा घेतला होता. त्यात अकस्मात मृत्यूचे एक हजार ४०० गुन्हे प्रलंबित असल्याचे समोर आले होते. शवविच्छेदन अहवाल देण्यासाठी डॉ. तावरे हा पोलिस कर्मचाऱ्यांकडे पैशांची मागणी करीत असल्याचे समोर आले आहे.
राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाकडून पुणे पोलिसांना पत्र प्राप्त झाले आहे. अपघातातील अल्पवयीन आरोपीची ओळख उघड करणाऱ्या दोन ट्विटर (एक्स) हँडलची माहिती आयोगाने पोलिसांना पाठवली आहे. आयोगाने या दोन ट्विटर हँडलवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचा नमुना बदलल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरेच्या घराची मंगळवारी (ता. २८) रात्री झडती घेतली.
कॅम्प परिसरातील गीता सोसायटीमध्ये डॉ. तावरेची सदनिका आहे. रात्री उशिरापर्यंत घराची झडती सुरू होती. त्यात काही महत्त्वाची कागदपत्रे आणि साहित्य जप्त करण्यात आल्याचे समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.