Pune : गणेशोत्सवासाठी पोलीस विभागाकडून नियमावली जाहीर

गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे अनेक सण उत्सावांवर निर्बंध लादण्यात आले होते.
Pune : गणेशोत्सवासाठी पोलीस विभागाकडून नियमावली जाहीर
Updated on

Pune Police Rules For Ganesh Festival : गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे अनेक सण उत्सावांवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, यंदाच्या वर्षी सर्व सण कोणत्याही निर्बंधांशिवाय उत्साहात साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्सवाचे वातावरण पसरले आहे. त्यात आगामी काळात सर्वांचा जिवाभावाचा उत्सव म्हणजेच गणपतीचे आगमत होणार असून, याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकाडून गणेशोत्सव उत्सवासाठी नियमावाली जाहीर करण्यात आली असून, गणेशोत्सवासाठी ३०हून अधिक नियम आणि अटींचे पालन करावे लागणार आहे.

Pune : गणेशोत्सवासाठी पोलीस विभागाकडून नियमावली जाहीर
स्पाईसजेटवर DGCA ची मोठी कारवाई, 50 टक्के फ्लाइट्सवर 8 आठवड्यांसाठी बंदी

काय आहेत महत्त्वाचे नियम :

  • श्रींची मूर्ती स्थापना व आरास संदर्भात गणेश मंडळाने आपले मंडळ धर्मदाय आयुक्त यांचेकडे नोंदणी करुन घेणे आवश्यक असणार आहे.

  • गणपती स्थापनेपूर्वीच सर्व मंडळांनी पोलीस परवाना घेणे बंधनकारक असणार आहे.

  • एक खिडकी योजनेअंतर्गत परवाने काढण्याची मोहीम सुरू केली आहे.

  • वर्गणी सक्तीने अगर वाहने अडवून जमा न करण्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे.

  • गणपती मंडप सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रस्त्याचा १/३ भाग उपयोगात आणून बांधावा.

  • मंडप बांधण्यापूर्वी गणेशोत्सव परवाना प्राप्त करणे बंधनकारक असणार आहे.

  • मंडप व गणपती स्थापनेचे आसन मजबूत असावे. तसेच श्री मूर्तीचे पाऊस व आगीपासून संरक्षणाची काळजी घ्यावी.

  • गणेश मूर्तीची उंची मर्यादित असावी.

  • कार्यक्रमाच्या ठिकाणी आग प्रतिबंधक उपाययोजना उपलब्ध केलेली असावी. तसेच वाळूच्या बादल्या भरून ठेवण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.

  • सजावटीमध्ये हॅलोजेन सारखे प्रखर दिवे लावण्याचे टाळावेत. प्रेक्षक, सुरक्षा रक्षक यांच्या डोळ्यावर प्रखर प्रकाश पडणार नाही याची दक्षता घ्यावी.

  • रोषणाई आणि विद्युतीकरणाचे काम वायरमनकडून करून घ्यावे.

  • विद्युत प्रवाह खंडित झाल्यास जनरेटर असावे.

  • उत्सवामध्ये किंवा मिरवणुकीत देखव्या संदर्भात पोलिसांना माहिती द्यावी.

  • संपूर्ण उत्सव काळात मंडळाच्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाची यादी आणि रूपरेषा पोलिसांना आगाऊ कळवावी.

  • ध्वनिक्षेपकाचा वापर सर्वोच्च न्यायलायकडून ठरवून दिलेल्या अटीनुसार असाव्यात

Pune : गणेशोत्सवासाठी पोलीस विभागाकडून नियमावली जाहीर
Video : महाराष्ट्रापाठोपाठ भाजपचे बंगालमध्ये मिशन लोटस? मिथुन चक्रवर्तींचा दावा
  • श्रींची मूर्ती किंवा सजावटीची देखभाल करण्यासाठी मंडळाचे ५ कार्यकर्ते अथवा सुरक्षा रक्षक २४ तास मंडपात नेमावे.

  • आगीची दुर्घटना होणार नाही याची दक्षता घ्यावी.

  • करमणुकीचे कार्यक्रम पाहण्यासाठी मंडपासमोर योग्य दोर लावून ठेवाव्यात.

  • मंडळामध्ये अथवा मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी मद्यपान करू नये.

  • मंडपामध्ये किंवा इतरत्र अनोळखी, संशयित वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे.

  • अफवा पसरवू नका, स्त्रियांनी दागिने सांभाळावे, मुलांना एकटे सोडू नका अशा सूचना असलेले फलक मंडपासमोर लावावे.

  • वर्गणी गोळा करण्याच्या नावाखाली नागरिकांवर जबरदस्ती करू नये.

  • गणेश विसर्जन मिरवणूक विहित वेळेत संपवावी.

  • मिरवणुकीत बैलगाडी किंवा इतर गाड्यांचा वापर करणे टाळावे.

  • मिरवणुकी दरम्यान 2 मंडळांमध्ये अंतर ठेऊ नये.

  • लहान मुलांना पाण्याजवळ नेणे टाळावे.

  • गुलालाचा कमीत कमी वापर करावा.

  • मिरवणुकीवेळी प्रत्येक मंडळाला जास्तीत जास्त 2 बॉक्स कमानी उभारता येतील. त्याची उंची २० फुटांपेक्षा जास्त असू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.