पुणे : पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळी अटकेत

तीन पिस्तुलांसह पाच जिवंत काडतुसे जप्त
two arrested
two arrestedsakal media
Updated on

पुणे : सिंहगड रस्ता (sinhgad road) परिसरातील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकून तेथील रोकड लुटण्याच्या तयारीत असणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. पोलिसांनी (pune police) त्यांच्याकडून देशी बनावटीचे तीन पिस्तुल व पाच जिवंत काडतुसे जप्त केली.

किरण शिवाजी खवळे (वय 22, रा. भीमाई हाऊसिंग सोसायटी, निगडी), विल्यम जॉन पीटर (वय 22, रा. किरकिटवाडी, सिंहगड रस्ता), वैभव राजू खिरीट (वय 24, रा. गोऱ्हे बुद्रुक, ता. हवेली), आकाश गोपीनाथ मते (वय 23, रा. वृंदावन गार्डन, कोल्हेवाडी, सिंहगड रस्ता) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. किरण खवळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोका) कारवाई केली होती. खवळे हा मागील आठ महिन्यांपासून फरारी होता.

two arrested
भिमाशंकरमध्ये महाभिषेक अणि पूजा, विविधरंगी फुलांची सजावट;पाहा व्हिडीओ

दरम्यान, सिंहगड रस्ता परिसरातील पेट्रोल पंपावरील रोकड लुटण्यासाठी चोरट्यांची टोळी येणार असल्याची खबर गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हे शाखेच्या युनीट तीनच्या पथकाचे पोलिस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सहाय्यक पोलिस निरीक्षक अमृता चवरे, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, संतोष क्षीरसागर, राजेंद्र मारणे, महेश निंबाळकर, विल्सन डिसोझा, दिपक क्षीरसागर यांच्या पथकाने हि कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.