पुणे - वाहतूक पोलिसांनी हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीस्वार कर्मचाऱ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले. तर हेल्मेट परिधान न केलेल्या वाहनचालकांना हेल्मेटचे महत्त्व समजावून त्यांचे प्रबोधन केले. सरकारी कार्यालयांसमोर बुधवारी (ता. २४) वाहतूक पोलिस विनाहेल्मेट वाहनचालकांचे प्रबोधन करीत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी हेल्मेट परिधान न करणाऱ्या एक हजार ६२६ दुचाकीस्वार कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली.
देशात दररोज ४११ नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. वाहन अपघातात मृत्यू होणाऱ्या व्यक्तींमध्ये ८० टक्के व्यक्ती दुचाकीस्वार आणि पादचारी असतात. दुचाकीचा अपघात झाल्यास हेल्मेटमुळे जीव वाचण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे रस्ते अपघातांबाबत सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी २४ मे रोजी सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’ साजरा करण्याचे आवाहन केले होते.
यासंदर्भात शहर वाहतूक शाखेकडून सरकारी कार्यालये, महापालिका, महावितरण, शाळा- महाविद्यालये, सरकारी रुग्णालये यांच्या प्रवेशद्वारावर वाहतूक पोलिसांची नेमणूक केली होती. पुणे शहर पोलिसांचे हेल्मेट जनजागृती अभियान केवळ रस्ते सुरक्षाच नव्हे, तर नागरिकांना त्यांची जबाबदारी पटवून देण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या अभियानाला पाठिंबा असून, आपण मिळून अभियान यशस्वी करू, असे रईस शेख या नागरिकाने सांगितले.
नागरिकांना हेल्मेटचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रथम सुरुवात प्रशासकीय कार्यालयांपासून करणे महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने आज केवळ प्रशासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती केली होती. संपूर्ण शहर, जिल्ह्यात हेल्मेट सक्तीचे आदेश दिले नसून केवळ ही जनजागृतीपर मोहीम राबविण्याचा मानस आहे. प्रशासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला.’’
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.