Pune Porsche Accident : कल्याणीनगर अपघातानंतर अनधिकृत बारवरील कारवाई मंदावली... राजकीय आश्रय असल्याने टाळाटाळ?

Pune Porsche Accident : गेल्या सहा दिवसात ५५ अनधिकृत बार, पबवर कारवाई करून १ लाख ७ हजार हजार चौरस फुटाचे बांधकाम पाडून टाकले आहे.
Pune Porsche Accident  Action against unauthorized bars slowed down marathi Latest News
Pune Porsche Accident Action against unauthorized bars slowed down marathi Latest News
Updated on

पुणे, ता. ३१ : कल्याणीनगर येथील अपघाताच्या घटनेनंतर महापालिकेच्या बांधकाम विभागाने शहरात अनधिकृत पब, बार, रेस्टॉरंटवर कारवाई सुरु केली आहे. गेल्या सहा दिवसात ५५ अनधिकृत बार, पबवर कारवाई करून १ लाख ७ हजार हजार चौरस फुटाचे बांधकाम पाडून टाकले आहे. पण आता कारवाईचा वेग मंदावला आहे. शहरात अद्यापही अनेक अनधिकृत रुफटॉप हॉटेल, बार असून, राजकीय पदाधिकाऱ्यांना आश्रय असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे.

पुणे शहरात बाणेर, बालेवाडी, कोथरूड, कोरेगाव पार्क, कात्रज, भांडारकर रस्ता, कोंढवा, बिबवेवाडी, आंबेगाव, धायरी, नऱ्हे, वारजे, लोहगाव, हडपसर, पिसोळी, उंड्री, खराडी, मुंढवा, कल्याणीनगर, वडगाव शेरी यासह इतर भागात इमारतींच्यावर ‘रुफ टॉप हॉटेल’ सुरु केले आहेत. मोकळ्या जागा, नदी काठच्या मोकळे प्लॉटमध्ये येथे पब सुरु आहेत. बांधकाम विभागाकडून अशा हॉटेलला परवानगी दिली जात नाही. एका खोलीसाठी बांधकाम परवानी घेऊन आख्ख्या गच्चीवर मोठे शेड मारून दारू व जेवण पुरविले जात आहे.

अनेक ठिकाणी रहिवासी भागात रेस्टॉरंट, बार, पब सुरु झाल्याने तेथील रहिवाशांना गोंधळ आणि पार्किंगच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पण तक्रारी करूनही महापालिकेकडून कारवाई केली जात नव्हती. कल्याणीनगर येथील पोर्शे कारच्या अपघातामध्ये दोघांचा बळी घेतला. यातील अल्पवयीन आरोपीने पब मध्ये दारू पिल्याचे उघडकीस आल्याने संपूर्ण शहरात पब, बारमध्ये होणारे नियमांचे उल्लंघन, अनधिकृत बांधकामे याकडे महापलिका, पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष गेल्याने आता कारवाई सुरू झाली आहे.

Pune Porsche Accident  Action against unauthorized bars slowed down marathi Latest News
Pune Transport Changes : गणेशखिंड रस्त्यावर वाहतुकीत बदल ; उद्यापासून वाहनचालकांसाठी लागू होणार

पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने शहरात २२ मे पासून अनधिकृत बार, पब, रेस्टॉरंटवर कारवाई सुरु केली आहे. सुरुवातीला कारवाईचा जोर चांगला होता, पण आता कारवाई संथ झाली आहे. कोथरूड, बाणेर, बालेवाडी, कोंढवा, महंमदवाडी, हडपसर या भागात अनेक अनधिकृत बार, पब आहेत. यामध्ये आमदार, माजी आमदार, माजी नगरसेवकांसह अन्य पदाधिकाऱ्यांची भागीदारी आहे. हे बार अनधिकृत असल्याचे माहिती असूनही अजून कारवाई झालेली नाही. आत्तापर्यंत २२ ते २९ मे या दरम्यान झालेल्या कारवाईत ७९ हॉटेलवर कारवाई करून १ लाख ७ हजार २९९ चौरस फुटाचे बांधकाम पाडले आहे. त्यामध्ये ५५ रेस्टॉरंट, बार आणि पबचा समावेश आहे. उर्वरित ठिकाणी छोटे हॉटेल खानावळ यांचे फ्रंट मार्जिन, साइड मार्जिनमधील यांचे अतिक्रमण आहे.

कारवाई टाळण्यासाठी हॉटेल बंद

कल्याणीनगर येथील घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नियमांचे उल्लंघन करणारे पब, बार सील केले आहेत. महापालिकेनेही अनधिकृत बांधकाम पाडून हॉटेल बंद पाडले आहेत. पण ही कारवाई पुढचे एक दोन आठवडे सुरु राहिली. तो पर्यंत हॉटेल बंद ठेवण्याबाबत प्रशासनातून टीप मिळाल्यानंतर सध्या बार, हॉटेल बंद ठेवले आहेत. कल्याणीनगर येथील प्रकरणाची चर्चा बंद झाल्यानंतर स्थिती पूर्ववत होईल त्यानंतर हॉटेल सुरु केले जातील अशीही चर्चा सुरु आहे.

Pune Porsche Accident  Action against unauthorized bars slowed down marathi Latest News
Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

अशी झाली कारवाई

तारीख - कारवाईची संख्या - पाडलेले क्षेत्र (चौरस फुटामध्ये)

२२ मे - ४० - ५४,३००

२४ मे - १४ - १५,९२५

२५ मे - १२ - ११,९२५

२७ मे - ४ - १०३४९

२८ मे - ५ - १२,८००

२९ मे - २ - २०००

एकूण - ७९ - १,०७,२९९

Pune Porsche Accident  Action against unauthorized bars slowed down marathi Latest News
Pune Porsche Accident: कल्याणीनगर अपघात प्रकरणातील रक्ताचे नमुना घेण्याबाबत तपास अधिकाऱ्यांची न्यायालयात मोठी माहिती; CCTV नसलेल्या...

‘‘झोन १,२,३ या भागातील अनधिकृत बार, रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आलेली आहे. जेथे कारवाई केली त्याची यादी राज्य उत्पादन शुल्क विभागालाही दिली आहे. आणखी काही ठिकाणे राहिली असतील त्यावरही कारवाई केली जाणार आहे.’’ - श्रीधर येवलेकर, अधिक्षक अभियंता

बांधकाम विभागाने जुन्या हद्दीतील झोन ४,५,६ मध्ये कारवाई केली आहे. जवळपास ७० ते ८० टक्के अनधिकृत बार, रेस्टॉरंटवर कारवाई केली आहे. कारवाईचा जोर कमी झालेला नाही. बांधकाम शेड काढल्यानंतर पुन्हा हॉटेल सुरु करण्याचा प्रयत्न केला तर कारवाई केली जात आहे’’

- राजेश बनकर, अधिक्षक अभियंता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.