Pune Porsche Accident: आमदार टिंगरेंनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर अजितदादांचा पुणे पोलीस आयुक्तांना फोन; काय झाली चर्चा?

या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप केल्याचा आरोप सुनिल टिंगरे यांच्यावर करण्यात आला आहे.
porsche motors pune accident
porsche motors pune accidentesakal
Updated on

पुण्यातील पोर्शे या आलिशान कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्यानं सध्या राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या तपासावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पण त्यासाठी राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार सुनिल टिंगरे यांच्यावरही याप्रकरणात आरोप झाले. यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस आयुक्तांशी फोनवरुन चर्चा केली. (Pune Porsche Accident Ajit Pawar call to Pune Police Commissioner Amitesh Kumar after MLA Tingre clarified his stand)

porsche motors pune accident
Shrirang Barne: "अजितदादांच्या काही कार्यकर्त्यांनी माझा प्रचारच केला नाही"; श्रीरंग बारणेंची खदखद

पोलीस आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर पुण्यातील या 'ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह' केसमध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप न जुमानता दोषींवर योग्य त्या कायदेशीर कारवाईचे निर्णय घ्यावेत अशा सूचना पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणे पोलिस आयुक्त यांना दिल्या.

राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा आरोप त्यांच्यावरती झाला होता. त्या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावरती आपली भूमिका स्पष्ट केली होती. यानंतर स्वतः अजित पवारांनी या प्रकरणात लक्ष घातलं आहे.

porsche motors pune accident
Pune Pub Policy: अपघातप्रकरणी उलटसुलट आरोप झाल्यानं पोलीस आयुक्तांची मोठी घोषणा! 'पब्ज'बाबत दोन दिवसांत आणणार नवीन धोरण

नेमकं काय घडलं?

पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये १८ मे ची मध्यरात्र उलटल्यानंतर पहाटे २.३० वाजता भरधाव आलिशान पोर्शे या मोटारीनं दुचाकीस्वार आणि इतर दोन वाहानां धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील एक तरुण आणि तरुणी जागीच ठार झाले. त्यानंतर ही कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलगा पळून जात असताना स्थानिक नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला. त्यानंतर येरवडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. आरोपी अल्पवयीन मुलगा वेदांत अग्रवाल हा बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे. कार चालवताना तो दारु प्यायला होता, हे बारमधील सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झालं आहे.

अल्पवयीन असल्यानं त्याला बाल न्याय मंडळाच्या दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. या सुटीकालीन न्यायालयानं आरोपीला जामीन मंजूर केला आणि त्याची सुटका केली. याप्रकारामुळं नंतर नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

porsche motors pune accident
Kyrgyzstan Violence : किर्गिस्थान हिंसाचार! संभाजीनगर, धाराशिव, बीडचे ५०० विद्यार्थी अडकले; होणार ऑनलाईन परीक्षा

टिंगरे यांच्या तत्परतेबद्दल संताप

स्थानिक आमदार सुनिल टिंगरे हे रविवारी पहाटे तीनच्या सुमारास तत्परतेने येरवडा पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावर नागरिकांनी आक्षेप घेतला असून टिंगरे हे आरोपीसाठी तत्परतेनं पोलीस ठाण्यात पोहोचले असा आरोप त्यांनी केला आहे. "आपल्या मुलाला मारहाण होत असल्याचा फोन बिल्डर विशाल अग्रवाल यांनी आपल्याला केला, त्यामुळं आपण पोलीस ठाण्यात गेलो होतो असं टिंगरे यांनी सांगितल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.