Pune Porsche Accident: ड्रायव्हर मुंबईत, अग्रवाल कोल्हापुरात...; कल्याणीनगर अपघात प्रकरणी असा दिला पोलिसांना गुंगारा

पुण्यातील आलिशान भरधाव वेगात असलेल्या पोर्शे कारनं धडक दिल्यानं बाईकवरील दोन इंजिनिअर तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता.
Pune Porsche Accident
Pune Porsche AccidentEsakal
Updated on

पुण्यातील आलिशान भरधाव वेगात असलेल्या पोर्शे कारनं धडक दिल्यानं बाईकवरील दोन इंजिनिअर तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता अनेक नवे खुलासे होत आहेत. आपल्या अल्पवयीन मुलाच्या या कृत्यानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी बिल्डर विशाल अग्रवालनं त्यांना गुंगारा देत राहिला.

त्यासाठी त्यानं अनेक क्लृप्ता केल्या वारंवार आपलं लोकेशन बदललं पण अखेर पोलिसांनी मंगळवारी सकाळी त्याला संभाजीनगर इथून ताब्यात घेतलं. पाहुयात नेमकं काय घडलं? (Pune Porsche Accident driver in Mumbai Agarwal in Kolhapur how Police making fool)

Pune Porsche Accident
Gajanan Kirtikar: "गजानन किर्तीकरांची पक्षातून हाकालपट्टी करा"; शिशिर शिंदेंची मुख्यमंत्र्यांकडं मागणी

आपल्या अल्पवयीन मुलाच्या कृत्यानंतर जसं विशाल अग्रवालला जाणीव झाली की आता आपल्याला अटक होणार. त्यानंतर तो पहिल्यांदा पुण्यातील आपल्या फार्म हाऊसवर गेला. त्यानंतर तिथून कोल्हापूरला गेला, इथं तो आपल्या एका मित्राला भेटला त्यानंतर विशालनं आपल्या एका ड्रायव्हरला मुंबईला पाठवलं. कारण पोलिसांना असं वाटायला हवं की तो कोल्हापूरला गेला त्यानंतर तिथून मुंबईला गेला.

Pune Porsche Accident
निर्भया प्रकरणानंतर कोणते कायदे बदलले? पुणे अपघात प्रकरणात आले चर्चेत, न्यायालयाच्या भूमिकेवर का येतोय संशय

पण प्रत्यक्षात विशाल अग्रवाल कोल्हापुरातून आपल्या मित्राच्या कारनं छत्रपती संभाजीनगर इथं गेला. आपला ठावठिकाणा कोणालाही लागू नये, यासाठी त्यानं आपल्या कुटुंबियांना देखील चुकीची माहिती दिली. त्यानं आपण मुंबईला चाललो असल्याचं आपल्या कुटुंबियांना सांगितलं होतं. यानंतर त्यानं आपला मोबाईल स्वीचऑफ केला. त्यानंतर त्यानं संपर्कासाठी नवं सीमकार्डही विकत घेतलं.

पण पोलिसांना विशालच्या मित्राच्या कारमधील जीपीएसमुळं त्याच्या हालचालीचा पत्ता लागला. त्यानंतर पोलिसांनी वेगानं सूत्र हालवत सीसीटीव्ही चेक केले. तसेच विशालनं आपल्या कुटुंबियांना मेसेज केला होता त्या मोबाईलचं लोकेशन तपासलं असताना तो संभाजीनगरच्या एका छोट्या लॉजमध्ये लपल्याचं पोलिसांना कळालं. इथून पोलिसांनी त्याला अटक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.