Pune Porsche Accident: 'मुलाने गाडी चालवायला मागितली तर दे', विशाल अग्ररवालने दिलेली सूचना; ड्रायव्हरने जबाबात दिली माहिती

Pune Porsche Accident: मुलाने गाडी चालवायला मागितली तर दे अशी सूचना विशाल अग्रवालने त्यांच्या कार चालकाला दिली होती, अशी माहिती चालकाने आपल्या जबाबात दिली आहे.
Pune Porsche Accident
Pune Porsche AccidentEsakal
Updated on

पुणे : मुलाने गाडी चालवायला मागितली तर त्याला गाडी चालवायला दे. तू त्याच्या बाजूला बस, अशी सूचना विशाल अग्ररवाल यांनी दिली असल्याचे चालकाने त्याच्या जबाब सांगितले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भरधाव वेगात महागडी कार चालवीत दुचाकीला दिलेल्या धडकेत तरुण व तरुणीच्या मृत्यूप्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील आणि आरोपीने ज्या पबमध्ये मद्यपान केले त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना बुधवारी (ता. २२) सत्र न्यायाधीश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.

आरोपीचे वडील व बांधकाम व्यावसायिक असलेले विशाल सुरेंद्रकुमार अग्ररवाल(वय ५०, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), ब्लॅक पबचा कर्मचारी नितेश धनेश शेवानी (वय ३४ रा. एन आय बी एम) आणि जयेश सतीश गावकर (वय २३, रा. केशवनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी आरोपी चालवत असलेल्या पोर्शे कारमधील चालकाचा जबाब नोंदवला आहे. या जबाबत चालकाने नमूद केले आहे की, आरोपीचे वडील विशाल अग्ररवाल यांनी त्याला सूचना केली होती की, मुलाने जर गाडी चालवायला मागितली तर त्याला गाडी दे आणि तू बाजूला बस. या सूचनेनुसार त्याने मुलाला गाडी चालवायला दिली होती, असे जबाब नमूद आहे.

Pune Porsche Accident
Pune Porsche Accident : पुणे कार अपघातप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय; विशाल अग्रवालसह तिघांना २४ मेपर्यंत पोलीस कोठडी

अल्पवयीन मुलगा ज्या हॉटेल व क्लबमध्ये पार्टीसाठी जाणार आहे, त्या हॉटेल व क्लबमध्ये दारू मिळते याची माहीती अग्ररवाल यांना होती. तरी देखील त्यांनी त्याला पार्टीला जाऊ दिले. पार्टीसाठी जाताना त्याला पॉकेटमनी दिला होता का? पार्टीसाठी अल्पवयीन मुलाला नेमके किती पैसे दिले होते किंवा स्वतःचे क्रेडीटकार्ड वगैरे दिले होते काय? अल्पवयीन मुलासोबत पार्टीसाठी कोणकोण होते? या बाबत आरोपीकडे सखोल तपास करून पुरावे हस्तगत करायचे आहेत. त्यासाठी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील विद्या विभूते आणि योगेश कदम यांनी केला.

गावकर आणि शेवानी यांनी आरोपी अल्पवयीन आहे की नाही, याची तपासणी न करता त्यांना मद्यपान करण्याची परवानगी दिली, असे ऍड. विभुते यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. आरोपींच्यायावतीने ऍड. सुधीर शहा, ऍड. अमोल डांगे आणि ऍड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने तीनही आरोपींना २४ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तिघांनाही येरवडा पोलिस ठाण्यातील कोठडी ठेवण्यात येणार आहे.

Pune Porsche Accident
Pune Porsche Accident : ...म्हणून विशाल अग्रवालला सात दिवसांची कोठडी द्या! सरकारी वकिलांची कोर्टात मागणी

ग्राहक न्यायालयात पोर्शे मोटारचा दावा सुरू

अपघातग्रस्त मोटार ही बंगळूरमधून खरेदी करण्यात आली होती. या मोटारीत तांत्रिक बिघाड असल्याचे अग्रवाल यांच्या निदर्शनास आले होते. गाडीतील तांत्रिक बिघाड दुरुस्त करून देण्याबाबत त्यांनी कंपनीशी वेळोवेळी संपर्क साधला होता. मात्र कंपनीने त्याची दखल न घेतल्याने याबाबत अग्ररवाल यांनी दिल्ली येथील राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली होती. तेथे दाखल असलेली तक्रार अद्याप प्रलंबित आहे.

त्यामुळे गाडीची अद्याप नोंदणी करण्यात आलेली नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला. मात्र त्यावर सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला. गाडीत तांत्रिक बिघाड आहे होता तर ती गाडी मुलाला चालवण्यासाठी का दिला? असा सवाल उपस्थित करत गाडीबाबतची पूर्वकल्पना असताना देखील त्याला ती चालवयला देणे गंभीर आहे, असे ऍड. विभुते यांनी न्यायालयात सांगितले.

Pune Porsche Accident
Pune Porsche Accident: दोघा न्यायाधीशांची सहीच नाही? कल्याणीनगर अपघात प्रकरणातील बाल न्याय मंडळाच्या निकालावर पोलिसांचा आक्षेप

अग्ररवाल यांनी मोबाईल लपवला

अग्ररवाल यांना मंगळवारी (ता. २१) पोलिसांनी संभाजीनगर येथून अटक केली आहे. अटकेतनतर त्यांची झडती घेतली आता त्यांच्याकडे एक साधा मोबाईल आढळून आला आहे. त्यातील सिम हे १९ मेला नोंदवले आहे. अगरवाल यांनी त्याचे मूळ मोबाईल लपून ठेवले आहेत. त्यात या गुन्ह्याच्या अनुषंगाने काही पुरावे असू शकता असे पोलिसांनी नमूद केले.

पोलिसांना दिली चुकीची माहिती

या गुन्हाबाबत तपास सुरू केला असता पोलिसांनी अग्ररवाल यांना फोन करून ते कुठे आहेत याबाबत माहिती विचारली होती. तेव्हा ते पुण्यात असताना देखील त्यांनी आपण शिर्डीला असल्याची खोटी माहिती दिली होती, असे या गुन्ह्यातील तपास अधिकारी पोलिस निरीक्षक गणेश माने यांनी न्यायालयात सांगितले.

अग्ररवाल यांच्यावर शाईफेक

अग्ररवाल यांना न्यायालयात आणले तेव्हा न्यायालयात हजर असलेल्या वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाईफेक केली. त्यामुळे वातावरण गंभीर बनले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत अगरवाल याला न्यायालयात नेले.

Pune Porsche Accident
Pune Porsche Accident: मोक्का लावा.. पुणे न्यायालयाच्या बाहेर गोंधळ! विशाल अग्रवालवर शाई फेकली; नेमकं काय घडलं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.