पुणे:- पुण्यातील कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणातील त्या अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आल्यावर आता आणखी एकाला अश्याच पद्धतीने सुरेंद्र कुमार अगरवाल यांनी धमकी दिल्याचं समोर आलं आहे. याबाबत 2021 पासून अर्जदार मुश्ताक शब्बीर मोमीन हे पुणे पोलिसांना, तसेच सीबीआय यांना अर्ज देत असून आत्ता पुन्हा त्यांनी पुणे पोलिसांना याबाबत अर्ज केला आहे.
ब्रह्मा बिल्डर्सचे मालक आणि कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती उघड झाली होती. भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादात सुरेंद्र अग्रवाल यांनी छोटा राजनची मदत घेतली होती. या प्रकरणी अजय भोसले यांच्या हत्येच्या प्रयत्नामध्ये सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्याविरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हे प्रकरण 2009 मध्ये झालं होतं. त्यानंतर याच सुरेंद्र कुमार यांनी 2021 मध्ये एका व्यवहाराबाबत मुश्ताक मोमीन यांची आर्थिक फसवणूक करीत त्यांना ऑफिस वर बोलवून तुला मारून टाकेल अशी धमकी दिल्याचं समोर आलं आहे.
याबाबत अर्जदार मुश्ताक मोमीन म्हणाले की, "सुरेंद्र अग्रवाल, विशाल अग्रवाल आणि जसप्रीत सिंग राजपाल यांना कोंढवा येथील एका जागेचा वादविवाद मिटवून ताबा मिळवून दिलं होतं आणि यासाठी आमच्यात आर्थिक व्यवहार देखील झाले होते. 1 ऑगस्ट 2021 मला अग्रवाल यांनी त्यांच्या कार्यालयात बोलावलं आणि अश्लिल भाषेत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली व म्हणाले "तुझी लायकी नाही, तु काय काम केलंस? मी तुला दिड कोटी रूपये देणार नाही तुला जायचे तिथे जा, तु माझ काहीही वाकडं करू शकत नाही, माझी ओळख खुप वरपर्यंत आहे."
"अंडरवर्ल्डशी माझे डायरेक्ट संबंध आहेत, पोलिस मी खिशात घेवून फिरतो, तुझा अजय भोसले करीन, त्याला जसा ठोकला तसा तुलाही ठोकीन, तो वाचला पण तू वाचणार नाहीस, तुला खल्लास करून टाकीन, तुला आणि तुझ्या परिवाराला जगण्याची इच्छा असेल तर मी जेवढे दिले तेवढयात समाधान मान नाहीतर तुला आणी तुझ्या परिवाराला जिवानीशी हात धुवावा लागेल, माझ्या नादाला लागू नको, तुला खंडणीच्या प्रकरणात अडकून टाकेल व जेलची हवा खायला लावेल" अशी धमकी दिली असल्याचं मोमीन यांनी सांगितलं आहे."
ते पुढे म्हणाले की, याबाबत 2021 पासून मी पोलीस स्टेशन, पुणे पोलीस आयुक्त, तसेच सीबीआय, राज्यपाल यांना पत्र देत आहे. तरीही मला अजूनही न्याय मिळालेला नाही. आत्ता हे अपघाताचं प्रकरण समोर आल्यावर आज पुन्हा मी पुणे पोलिसांकडे अर्ज केलं असून मला न्याय मिळावा असंही यावेळी मोमीन म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.