Pune Porsche Accident: निबंध लिहिण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याला अखेर पत्रकारांनी घेरलं; पण प्रश्न विचारताच...; व्हिडिओ व्हायरल

Pune Porsche Accident: कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघाताच्या घटनेनंतर काही तासांतच बाल न्याय मंडळाने अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला होता. मात्र, 22 मे रोजी जामीन रद्द करून अल्पवयीन आरोपीला बालसुधार गृहात पाठवण्यात आले.
Pune Porsche Accident
Pune Porsche AccidentEakal
Updated on

पुण्यातील पोर्शे प्रकरणातील आरोपींना निबंध लिहिण्याच्या अटीवर जामीन देणारा अधिकारी आता रडारवर आला आहे. या आदेशाची चौकशी सुरू असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, बाल न्याय मंडळाचे सदस्य डॉ. एल.एन. धनावडे यांचा एक व्हिडिओ समोर आला असून, त्यात ते पत्रकारांच्या प्रश्नांपासून पळ काढताना दिसत आहेत. विशेष बाब म्हणजे घटनेनंतर काही तासांतच बाल न्याय मंडळाने अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला होता. मात्र, 22 मे रोजी जामीन रद्द करून अल्पवयीन आरोपीला बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे.

Pune Porsche Accident
Pune Porsche Accident: "माझ्या मनाला पटलं नाही, पण वरिष्ठांनी..." ; अपघातानंतर ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या ससूनच्या डॉ. हरनोळने दिली कबुली, तपासात धक्कादायक माहिती

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका वृत्तवाहिनीने व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये ज्या व्यक्तीला प्रश्न विचारला जात आहे तो व्यक्ती हा निकाल देणारा असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पत्रकार जेव्हा पोर्शेच्या घटनेशी संबंधित प्रश्न अधिकाऱ्यांना विचारतात तेव्हा ते पूर्ण मौन बाळगतात. दरम्यान, ते त्यांचे वाहन सुरू करून तिथून निघून जाताना दिसतात.

व्हिडीओनुसार, पत्रकार धावत्या गाडीच्या मागे जात धनावडे यांना सतत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. धनावडे हे बाल न्याय मंडळाचे गैर-न्यायिक सदस्य आहेत. विशेष म्हणजे मंडळाच्या तीन सदस्यांऐवजी केवळ त्यांनी जामीन आदेशावर स्वाक्षरी केली होती. या आदेशाची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र महिला व बालविकास विभागाने समिती स्थापन केली आहे.

Pune Porsche Accident
Pune Porsche Accident: ते ब्लड सॅम्पल फक्त आरोपीच्या आईचे नाहीत तर.. डॉ पल्लवी सापळेंनी बनवलेल्या अहवालात मोठी माहिती समोर

बदललेले ब्लड सॅम्पल अल्पवयीन आरोपीच्या आईचे?

इंडिया टुडेच्या वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले जात आहे की, अल्पवयीन आरोपीच्या आईने तिच्या मुलाच्या रक्ताचा नमुना बदलला होता. रविवारी 19 मे रोजी घडलेल्या या घटनेनंतर आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात आणण्यात आले, तेथे त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. विशेष बाब म्हणजे चाचणीत अल्कोहोल आढळून आले नाही.

यानंतर दुसऱ्या रुग्णालयात दुसऱ्या नमुन्याची डीएनए चाचणी केली असता रक्ताचा नमुना दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचे समोर आले. सध्या आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल हे अटकेत आहेत. तर अल्पवयीन आरोपी हा बालसुधारगृहात आहे.

Pune Porsche Accident
Pune Porsche Accident: 'पाहिजे तेवढे पैसे घ्या पण, मारू नका...', पोर्श अपघातातील आरोपी काय ओरडत होता? वाचा, प्रत्यक्षदर्शीच्या शब्दांत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.