pune accident
pune accidenteSakal

Pune Porsche Accident: हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट! 'मृत तरुण-तरुणी दारू पिऊन गाडी चालवत असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न'

Pune hit and run case Update: पुणे हिट अँड रन प्रकरणात मृत तरुण-तरुणी यांनी मद्य प्राशन केल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत.
Published on

पुणे- कल्याणीनगर येथील अपघाताप्रकरणी दररोज काहीनाकाही अपडेट समोर येत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांनी एक मोठा दावा केला आहे. पुणे हिट अँड रन प्रकरणात मृत तरुण-तरुणी यांनी मद्य प्राशन केल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत. देशमुख यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंदर्भातील पोस्ट केली आहे.

अनिल देशमुख आपल्या पोस्टमध्ये म्हणालेत की, 'पुणे हिट ॲन्ड रन प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारू न पिल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले,हे उघड झाले आहे. आता माजी गृहमंत्री म्हणून माझी माहिती अशी आहे की, मृतकांच्या Viscera Report मध्ये Alcohol +ve यावे याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे.'

pune accident
Pune Porsche Accident : अल्पवयीन आरोपीच्या पार्टीसाठी ४८ हजार नव्हे 'इतका' झाला खर्च; चौकशीत नवा खुलासा

जेणेकरुन या प्रकरणामध्ये मृत झालेले मोटरसायकल वरील तरुण तरुणी हे दारु पिऊन होते आणि त्यांच्यामुळेच हा अपघात झाला, असे न्यायालयात सिद्ध करता येईल. जेणेकरून विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटेल, अशा पद्धतीने प्रयत्न सध्या सुरु आहेत, असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.

pune accident
Pune Porsche Accident : अल्पवयीन आरोपीचा बालसुधारगृहातील मुक्काम १४ दिवसांनी वाढणार? पोलिसांचा बाल न्याय मंडळाला अर्ज

पुणे अपघात प्रकरणात आरोपीची कोठडी वाढवण्यात आली आहे. तो २५ जूनपर्यंत बालसुधार गृहात राहणार आहे. त्याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी आणखी वेळ मागितला आहे. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न झाल्याचे तपासातून समोर येत आहे. त्यातच आता अनिल देशमुख यांनी केलेल्या दाव्यामुळे पुन्हा नव्या चर्चेचा तोंड फुटू शकते. याप्रकरणी विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल याने भरधाव कार चालवत टूव्हीलरला उडवले होते. यात तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला लगेच जामीन मिळाला होता. मात्र, अनेकांनी आवाज उठवल्यामुळे त्याला बालसुधार गृहात पाठवण्यता आले. याप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा, आई-वडील हे सर्व तुरुंगात आहेत. कारण, त्यांनी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.