पुणे- कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. कारण, अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याने नवा दावा केला आहे. अपघाताच्या दिवशी माझा मुलगा नाही तर आमचा चालक पोर्शे कार चालवत होता असं तो म्हणाला आहे. पोलिसांच्या चौकशीत त्याने हा दावा केल्याचं सांगण्यात आलंय. इंडिया टूडेने यासंदर्भातील वृत्त दिलंय.
विशाल अग्रवाल याने दावा केलाय की, अपघात झाला त्यावेळी चालक कार चालवत होता. अल्पवयीन आरोपी मुलाच्या दोन मित्रांनी देखील या दाव्याचे समर्थन केलं आहे. पोलिसांनी चालकाची चौकशी सुरु केली आहे. चालकाने आपल्या पहिल्या जबाबात अपघातावेळी आपणच कार चालवत असल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
विशाल अग्रवाल याचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. अपघातासंदर्भात काही इनपूट या मोबाईलच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुणे क्राइम ब्रँच आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांची देखील चौकशी करत आहेत. मुलगा आणि नातू यांच्याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी ही चौकशी केली जात आहे. अपघातादिवशी यांच्यामध्ये काय संभाषण झालं हे पाहिलं जात आहे.
पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये अल्पवयीन आरोपी मद्य पिऊन आलिशान पोर्शे कार भरधाव वेगात चालवत होता. यावेळी त्याने रस्त्यावरुन जाणाऱ्या टू-व्हीलरला धडक दिली. या धडकेमध्ये तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटनेमुळे एकच संतापाची लाट उसळली. कारण, आरोपी तरुण अल्पवयीन आहे आणि तो मद्य पिऊन कार चालवत होता.
अपघाताच्या काही तासातच आरोपीला जामीन मिळाला होता. यावरुन बराच गदारोळ झाला. अनेक सामाजिक संस्थांनी यावर रोष व्यक्त केला होता. सध्या आरोपी तरुणाला बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. आरोपीचे वडील पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल आहेत. त्यांची चौकशी सुरु आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.