Pune Porsche Accident: पोर्शेच्या अपघाताबाबत आणखी एक खुलासा, चावीसाठी आरोपीने ड्रायव्हरशी केलेलं भांडण; क्रेडिट कार्ड देखील घेतलेलं

Pune Porsche Accident: पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, 'रविवारी पोर्शे कारचा अपघात झाला तेव्हा १७ वर्षीय किशोर कार चालवत नव्हता आणि त्याऐवजी एक प्रौढ व्यक्ती कार चालवत होता, असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Pune Porsche Accident
Pune Porsche AccidentEsakal
Updated on

पुण्यातील कल्याणीनगर भागातील अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीबाबत आता मोठा खुलासा समोर आला आहे. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, रात्रीच्या वेळी अल्पवयीन आरोपीला त्याच्या आजोबांनी कारची चावी दिली होती. त्याला क्रेडिट कार्डही दिले होते. चावीवरून मुलाचे ड्रायव्हरसोबत भांडणही झाले होते. पोलिसांच्या चौकशीत आजोबांनीच हा खुलासा केल्याची माहिती आहे. तो म्हणाला, 'मी एका अल्पवयीन मुलाला गाडी चालवायला दिली पण त्याचे असे परिणाम होतील याची मला कल्पना नव्हती.'

पुणे पोलिसांनी त्या रात्री घडलेल्या घटनांचा क्रम तयार केला आहे जेव्हा पोर्शेने दुचाकीला धडक दिली आणि त्यात दोन 24 वर्षीय अभियंत्यांचा मृत्यू झाला. याबाबत पोलिस पथकाने गुरुवारी १७ वर्षीय अल्पवयीन आरोपीचे आजोबा आणि चालकाकडे चौकशी केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा मुलगा त्याच्या दोन मित्रांसह 12वी बोर्डाची परीक्षा पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी बाहेर गेला होता.

Pune Porsche Accident
Pune Porsche Accident : पोलिसांमध्येच नव्हता ताळमेळ, घटनास्थळी जाऊनही....; निष्काळजीपणा भोवणार? २ पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता

या घटनेबाबत अधिकाऱ्यांनी काय सांगितले?

पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, 'रविवारी पोर्शे कारचा अपघात झाला त्यावेळी १७ वर्षीय अल्पवयीन तरूण कार चालवत नव्हता आणि त्याऐवजी एक प्रौढ व्यक्ती कार चालवत होता, असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अंतर्गत तपासात काही पोलीस कर्मचाऱ्यांचा गुन्हा दाखल करण्यात त्रुटी आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

पुढे ते म्हणाले की, आमच्या तपासादरम्यान अल्पवयीन मुलगा हा कार चालवत होता हे स्पष्ट झाले असून आम्ही घटनेशी संबंधित सर्व आवश्यक पुरावे गोळा केले आहेत. आरोपीने घर सोडले तेव्हा, त्याने कारसह घर सोडल्याची नोंद रजिस्टरमध्ये आहे.

Pune Porsche Accident
Pune Porsche Accident: '...तर तुला मारून टाकेन'; कल्याणीनगर अपघातातील आरोपीच्या आजोबाचं आणखी एक अंडरवर्ल्ड कनेक्शन आलं पुढे

या प्रकरणातील सर्व पुरावे गोळा करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्तांनी यावेळी बोलताना सांगितले आहे. पुराव्यांशी छेडछाड किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का, याचा तपास एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात येत आहे. पोलिसांची बाजू न्यायालयात प्रभावीपणे मांडण्यासाठी विशेष वकिलांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

काही पोलीस कर्मचाऱ्यांना चुकीच्या गोष्टी करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपांबाबत कुमार म्हणाले की, पोलिसांनी सुरुवातीपासूनच कठोर भूमिका घेतली आहे. पोलिसांवर दबाव होता किंवा पोलिसांचा निष्काळजीपणा होता, असे म्हणणे योग्य नाही. पण कलम ३०४ प्रथम का लागू करण्यात आली नाही याचा शोध सुरू आहे.

Pune Porsche Accident
Pune Porsche Accident: पोर्शे गाडीच्या कॅमेऱ्यातील अपघाताचा व्हिडीओ तपासणार; कल्याणीनगर अपघात प्रकरणी अतिरिक्त पोलिस आयुक्तांची माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.