Pune Porsche Accident:
महाविकास आघाडीने आज राज्य शुल्क विभागात आंदोलन केले. पुण्यातली बार आणि हप्त्याची वसुलीची यादी रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी अधिकाऱ्यांना वाचून दाखवली. पुणे पोर्शे अपघातानंतर पोलीस हप्ते घेत असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला होता. आता यादीच मविआ नेत्यांनी अधिकाऱ्यांना वाचून दाखवली.
रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे चांगलेच आक्रमक झाले आहे. पुण्यातील अवैध प्रकार सुरु आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागात जाऊन धंगेकर आणि अंधांनी तक्रार केली. त्यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर वसुलीची यादीच वाचली.
काँग्रेस नेते मोहन जोशी देखील यावेळी उपस्थित होते. पुण्यात पब आणि बारमध्ये पोलिसांकडून वसुली होते. दर महिना ७० ते ८० लाखांचा हप्ता घेतात, असा आरोप धंगेकर यांनी केला आहे.
लेट नाऊट, द माफिया, एजंट जॅक्स,डॉलर, बॅक स्टेज यांच्याकडून हप्ता वसुली होत असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला.
यावर पोलिसांनी ५४ पबवर कारवाई केल्याचे राज्य शुल्क उत्पादक विभागाच्या प्रमुखांनी सांगितले आहे. तसेच वर्षभरकात ५०० कोटींचा महसूल जमा केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच हफ्ते वसुलीची चौकशी करण्यात येईल कोणी आढळलं तर कारवाई करु, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महिन्याभरात १०८ कारवाई केली आहे. आमचे अधिकारी रांत्रदिवस काम करतात, असे पोलीस अधिकारी म्हणाले.
तर ४८ तासात जर अवैध बार वर कारवाई झाली नाही तर आम्ही तुम्हाला स्पॉटवर नेऊ, असा इशारा मोहन जोशी यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.