Pune Porsche Accident : अपघातानंतर पळून जाण्याचे कारण काय? विशाल अग्रवाल यांची पोलिसांकडून कसून चौकशी

पोलिसांनी गुरुवारी (ता. २३) विशाल यांचे वडील सुरेंद्रकुमार अग्रवाल, मोटारचालक आणि अपघाताच्या वेळी अल्पवयीन आरोपीच्या समवेत असलेल्या मित्राचीही चौकशी केली.
Pune Porsche Accident
Pune Porsche AccidentEsakal
Updated on

पुणे, ता. २३ : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला मोटार चालविण्यासाठी आणि मद्य पार्टीला परवानगी दिल्याप्रकरणी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पळून जाण्याचे कारण काय, अशी विचारणा केली. तसेच, पोलिसांनी गुरुवारी (ता. २३) विशाल यांचे वडील सुरेंद्रकुमार अग्रवाल, मोटारचालक आणि अपघाताच्या वेळी अल्पवयीन आरोपीच्या समवेत असलेल्या मित्राचीही चौकशी केली.

पळून जाण्याचे प्रयोजन काय?

पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याच्यावर पोलिसांनी प्रश्नांचा भडिमार केला. अल्पवयीन मुलाला मोटार चालविण्यासाठी आणि मद्य पार्टीला परवानगी का दिली? गुन्हा दाखल झाल्यानंतर पळून जाण्याचे प्रयोजन काय? असे प्रश्न विचारताच त्यांच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. त्यांचे वडील सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनीही पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती दिली होती. त्यामुळे त्यांनाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

भरधाव पोर्शे मोटारीने रविवारी (ता. १९) पहाटे दुचाकीला धडक दिल्याने संगणक अभियंता अनिष अवधिया आणि अश्विनी कोष्टा या दोघांचा मृत्यू झाला होता. विशाल अगरवाल यांच्या १७ वर्षीय मुलाविरुध्द येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याची बाल सुधारगृहात रवानगी केली आहे. तर, पोलिस कोठडीत असलेल्या विशाल अगरवाल (वय ५०, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), ब्लॅक पबचा कर्मचारी नीतेश धनेश शेवानी (वय ३४, रा. एनआयबीएम) आणि जयेश सतीश गावकर (वय २३, रा. केशवनगर) यांची पोलिसांनी आज कसून चौकशी केली. या तिघांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Pune Porsche Accident
Pune Accident Viral Video : कल्याणीनगर अपघातावर शिवीगाळ करणारे रॅप साँग व्हायरल? अल्पवयीन आरोपीचा व्हिडिओ असल्याचा दावा खोटा

पिता-पुत्राची समोरासमोर चौकशी-

पोलिसांनी अल्पवयीन मुलाचा आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल आणि विशाल अग्रवाल या पिता-पुत्राला समोरासमोर बसवून चौकशी केली. नातवाला जामीन मिळावा, यासाठी सुरेंद्रकुमार यांनी न्यायालयात हमी दिली होती. याबाबत त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. तसेच, सुरेंद्रकुमार आणि विशाल यांना अल्पवयीन मुलगा दारू पितो हे माहीत आहे का? तसेच तो वाहन परवाना नसताना मोटार कसा काय चालवत होता, असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले.

घरातून मोबाईल जप्त-

विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक केल्यानंतर एक साधा मोबाईल आढळून आला होता. परंतु त्यांनी मूळ मोबाईल लपवून ठेवला होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तो मोबाईल त्यांच्या घरातून जप्त केला. त्यात या गुन्ह्याच्या अनुषंगाने काही पुरावे असण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोटारचालकाबाबत संभ्रम कायम-

मुलाने गाडी चालवायला मागितली तर त्याला गाडी चालवायला दे. तू त्याच्या बाजूला बस, अशी सूचना विशाल अग्रवाल यांनी दिली असल्याचे चालक गंगाराम डोळसने त्याच्या जबाबात सांगितले होते. याबाबत पोलिसांनी चालकाची चौकशी केली. परंतु तो मोटारीत होता की नाही, याबाबत पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही.

Pune Porsche Accident
Pune Porsche Accident: '...तर तुला मारून टाकेन'; कल्याणीनगर अपघातातील आरोपीच्या आजोबाचं आणखी एक अंडरवर्ल्ड कनेक्शन आलं पुढे

अल्पवयीन मुलाच्या मित्रांची चौकशी-

अपघातावेळी अल्पवयीन आरोपीसमवेत त्याचे दोन मित्र होते. त्यापैकी एका मित्राला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तर दिल्लीतील अन्य एका मित्राला उद्या गुन्हे शाखेसमोर चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

पश्चात्ताप होतोय - सुरेंद्रकुमार अग्रवाल

सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना पत्रकारांनी नातवाने केलेल्या अपघाताबाबत विचारले असता, या सर्व बाबींचा पश्चात्ताप होत असल्याचे त्यांनी सांगितले. छोटा राजनच्या मदतीने गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते अजय भोसले यांनी केला होता. परंतु हे प्रकरण सीबीआयकडे असल्याने याबाबत आज कोणतीही चौकशी केलेली नाही. विशाल अग्रवाल यांना पळून जाण्यात मदत केली का, आणि इतर मुद्यांवर चौकशी करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Pune Porsche Accident
Dombivli MIDC Blast: डोंबिवली हादरली! MIDC मध्ये मोठा स्फोट, तीन जणांचा होरपळून मृत्यू; ३० ते ४० जण जखमी

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी धक्काबुक्की-

सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना चौकशीसाठी पोलिस आयुक्त कार्यालयात आणल्यानंतर वार्तांकन करणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांना प्रश्न विचारले. मात्र, त्यावेळी अग्रवालच्या निकटवर्तीयाकडून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना अरेरावी भाषा आणि धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे काही वेळ पोलिस आयुक्त कार्यालयातील वातावरण गंभीर बनले होते.

पोर्शे मोटारीची ‘फॉरेन्सिक’कडून तपासणी :

पोलिसांनी जप्त केलेल्या अपघातग्रस्त पोर्शे मोटारीची ‘फॉरेन्सिक’च्या पथकाकडून तपासणी करण्यात आली. या मोटारीची वेग मर्यादा, गाडीतील कॅमेरे, चित्रीकरण, अपघातानंतर झालेली मोटारीची स्थिती या सर्वांचा ‘फॉरेन्सिक’च्या पथकाने आढावा घेतला. याबाबतचा अहवाल लवकरच पोलिसांना सादर करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.