Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी अग्रवाल बाप-लेकाचे तपासात असहकार्य; दोघांना ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलाने आणि आजोबाने त्यांच्या बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.
Pune Porsche Car Accident
Pune Porsche Car AccidentEsakal
Updated on

पुणे: कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलाने आणि आजोबाने त्यांच्या बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. या गुन्ह्यांच्या अनुषंगाने आरोपींकडे तपास केला असता ते तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी (ता. २८) न्यायालयात दिली.

अपघाताचा गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी चालकावर दबाव आणत त्याचे अपहरण करून त्याला अन्यायाने ताब्यात ठेवल्याबाबत अपघात करणाऱ्या मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार ब्रम्हदत्ता अग्रवाल (वय ७७) आणि वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल (वय ५०, दोघेही रा. बंगलो क्र. १, ब्रम्हा सनसिटी, वडगाव शेरी) यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यातील सुरेंद्रकुमार अग्रवाल यांच्या पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपली. तर विशाल अग्रवाल यांना या गुन्ह्यात सोमवारी (ता.२७) रात्री अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही मंगळवारी एकत्रित न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासाबाबतची माहिती न्यायालयास दिली. या गुन्ह्यात चालक गंगाधर शिवराज हेरीक्रुब (वय ४२) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

Pune Porsche Car Accident
Pune Porsche Car Accident: 'ससून संशयाच्या भोवऱ्यात अडकणे हे चांगले लक्षण नाही'; कल्याणीनगर अपघात प्रकरणी सुप्रिया सुळे आक्रमक

अपहरणासाठी वापरलेली मोटार जप्त, मोबाईल बाकी

आरोपींनी त्यांचे चालक गंगाधर यांचे अपहरण करण्यासाठी वापरलेली बीएमडब्ल्यू मोटार जप्त करण्यात आली आहे. आरोपींनी धमकावून फिर्यादी यांचा फोन काढून घेतला होता. त्या मोबार्इलबाबत आरोपींकडे तपास केला असता ते उडवाउडवीचे उत्तर देत आहेत. त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून मोबार्इल जप्त करायचा आहे, अशी माहिती या गुन्ह्याचे तपास अधिकारी खंडणी विरोध पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी न्यायालयास दिली.

Pune Porsche Car Accident
Pune Porsche Accident : आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याच्या आरोपात अटक; कुटुंबीय म्हणतात, 'अजय तावरेंचा या प्रकरणाशी आणि ललित पाटीलशी...'

दोघांना ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी

गुन्ह्याची व्याप्ती पाहता या प्रकरणाचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. या गुन्ह्यात विशाल अग्रवाल यांना सोमवारी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे दोघांकडे एकत्रित तपास करायचा आहे. आरोपी पोलिसांना तपासात सहकार्य करत नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे गुन्ह्यांच्या पुढील तपासासाठी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील नीलेश लडकत यांनी केला. आरोपींच्या वतीने ॲड. प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने दोघांना ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Pune Porsche Car Accident
Pune Porsche accident : पोर्शे कार अपघात प्रकरणात अजित पवारांचा खुलासा; म्हणाले, मी फोन करत असतो पण...

काय आहे फिर्याद

येरवडा पोलिस ठाण्यातून मी माझे घरी जात असताना सुरेंद्र अग्रवाल सरांनी मला येरवडा पोलिस ठाण्याच्या बाहेर आल्यानंतर बोलावून घेतले. मला धमकी देऊन माझ्या इच्छेविरुद्ध त्यांच्याकडील बीएमडब्ल्यू गाडीमध्ये बसवून ब्रम्हा सनसिटी येथील त्यांचे बंगल्यात अणुच सुरेंद्रकुमार अग्रवाल व विशाल अग्रवाल यांनी संगनमत करून मला धमकावून माझा मोबाईल फोन काढून घेवुन त्यांच्या बंगल्यामध्ये बेकायदेशीर लपवून ठेवण्याच्या उद्देशाने डांबून ठेवले. त्यानंतर धमकाविले की, त्यांच्या मुलाने केलेला गुन्हा स्वतः वर घे व त्या बाबतीत कोणाशी बोललास तर याद राख, अशी फिर्याद गंगाधर यांनी दिली आहे.

Pune Porsche Car Accident
Pune Porsche Accident: अल्पवयीन आरोपीच्या जामीनाच्या आदेशावर सही देणारे जज नव्हे तर...; याप्रकरणातही चौकशीची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.